Bigg Boss Marathi 4 : ‘आटली बाटली फुटली’; चौथ्या पर्वातलं पहिलं वहिलं नॉमिनेशन कार्य

'बिग बॉस मराठी'चं चौथं पर्व (Bigg Boss Marathi 4) नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. सगळीकडे 'बिग बॉस मराठी 4'ची चर्चा सुरू आहे. यावेळी देखील सर्वच स्पर्धकांमध्ये काट्याची टक्कर असल्याचे दिसून आले आहे.

Bigg Boss Marathi 4 : ‘आटली बाटली फुटली’; चौथ्या पर्वातलं पहिलं वहिलं नॉमिनेशन कार्य

‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व (Bigg Boss Marathi 4) नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. सगळीकडे ‘बिग बॉस मराठी 4’ची चर्चा सुरू आहे. यावेळी देखील सर्वच स्पर्धकांमध्ये काट्याची टक्कर असल्याचे दिसून आले आहे. प्रिमिअरच्यावेळी सहभागी स्पर्धकांनी आपल्याविषयी काही गोष्टी सांगताना काही झालं तरी प्रेक्षकांसमोर आपली छाप सोडल्याशिवाय जायचं नाही हे सांगितलं होतं. त्यामुळे कोणकोणत्या स्पर्धकांपुढे नव्यानं आव्हान तयार झालं आहे हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल चार गटातील सदस्यांनी बहुमताने त्रिशूल, मेघा, रोहित आणि प्रसाद या सदस्यांना निरुपयोगी सदस्य दिले. काल बिग बॉस यांनी सिझनमधील एक मोठे सरप्राईझ देखील सदस्यांना दिले. ते म्हणजे “रूम ऑफ फॉर्च्युन”. ज्या खोलीमध्ये निरुपयोगी ठरलेल्या सदस्यांना चार दरवाजे दाखविले गेले, त्यातून त्यांना एका दरवाज्याची निवड करायची होती. या सांगकाम्या म्हणून झाहीर झालेल्या चारही सदस्यांना आता घरातील सगळी कामे करावी लागणार आहेत. पण, याचसोबत त्यांना एक पॉवर देखील मिळाली आहे. आता हे सदस्य या पॉवर चा कसा उपयोग करणार ? कोणाला नॉमिनेट करणार हे बघणे रंजक असणार आहे, कारण घरामध्ये पार पडणार हे सिझनचं पहिलं नॉमिनेशन कार्य “आटली बाटली फुटली” !

नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोनुसार नॉमिनेशन कार्यादरम्यान अमृता देशमुखने सदस्यांवर नाराजी व्यक्त केली. तिचे म्हणणे आहे,”बर नाहीये हे दिसते आहे तरी माझ्यावर येऊन बाटल्या फोडत आहात.” तर त्रिशूलने निखिल राजशिर्के यांना जागवायची गरज आहे म्हणून नॉमिनेशनमध्ये टाकले. आता बघूया पहिल्या आठवड्यात कोणते सदस्य होणार सेफ? कोणते सदस्य होणार नॉमिनेट? तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि – रवि रात्री ९.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर देखील पाहू शकता.

‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वातील पहिल्या आठवड्यात कोणते सदस्य सेफ होणार आणि कोणते सदस्य नॉमिनेट होणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. एक घर, १०० दिवस आणि १६ स्पर्धकांचा प्रवास आता सुरू झाली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आता मनोरंजनाची चांगलीच मेजवानी मिळत आहे.

हे ही वाचा:

विभागप्रमुखांनी प्रश्न विचारुन युवासेनेच्या कार्यपद्धतीवर व्यक्त केला राग

Dasara Melava : अमृता फडणवीसांचे मोठं वक्तव्य म्हणाल्या, एकनाथ शिंदे माझे फेवरेट आहेत…

Navratri 2022 : लालबागची माता नवरात्रोत्सवनिमित्त दर्शनासाठी भाविकांची गर्दी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version