Bigg Boss Marathi 4 बिग बॉस मराठीच चौथ पर्व जिंकणाऱ्या स्पर्धकाला बक्षीस म्हणून मिळणार ‘इतकी’ रक्कम!

Bigg Boss Marathi 4  बिग बॉस मराठीच चौथ पर्व जिंकणाऱ्या स्पर्धकाला बक्षीस म्हणून मिळणार ‘इतकी’ रक्कम!

बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi) हा कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक कार्यक्रम आहे. आता बिग बॉस मराठीचं चोथ्या पर्वाला संपायला अगदी काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. म्हणूनच कोणता स्पर्धक या पर्वात जिंकणार याकडे सर्व प्रेक्षकांचे आणि चाहत्याचे लक्ष लागलं आहे. त्याच बरोबर बिग बॉस मराठीच चौथ पर्व जिंकणाऱ्या स्पर्धकाला लाखो रुपये मिळणार आहे. या चौथ्या पर्वाचा अंतिम सोहळा हा ८ जानेवारीला असणार आहे.

बिग बॉस मराठी चौथ्या पर्वाचा (Bigg Boss Marathi 4) अंतिम सोहळा हा ८ जानेवारीला असून या परवाच्या विजेत्याला बक्षीस म्हणून नेमकी किती रक्कम मिळणार आहे याकडेही सगळ्यांच लक्ष लागलं आहे. तर जिंकणाऱ्या स्पर्धकाला तब्बल १५ लाखांचं बक्षीस मिळणार आहे. बिग बॉसच्या या चौथ्या पर्वात १६ स्पर्धक सहभागी झाले होते. पण टीआरपीच्या दृष्टिकोनातून बिग बॉस मराठीचे चौथे फार काही चालले नाही आहे. या कार्यक्रमाला २.८ रेटिंग मिळाले आहे. बिग बॉसचे चौथे पर्व हे प्रेक्षकांच्या पसंतीत यावं म्हणून निर्मात्यांनी कार्यक्रमात अनेक ट्विस्ट आणले होते. पण त्याचा काही उपयोग झालेला दिसला नाही आहे. या कार्यक्रमातील स्पर्धक प्रेक्षकांना फारसे आवडत नसल्याने त्याचा परिणाम थेट कार्यक्रमावर होताना दिसत आहे.

बिग बॉस मराठीच हे चौथ (Bigg Boss Marathi 4) पर्व जिंकणाऱ्या विजेत्याला १५ लाखांचं बक्षीस आणि ट्रॉफी देण्यात येणार आहे. म्हणूनच या पर्वाचा विजेता किंवा विजेती कोण ठरणार आहे याकडे सर्व चाहत्यांचा आणि प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. चौथ्या पर्वत आपल्या आवडत्या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पर्धकांना मदत करत आहेत. ८ जानेवारीला बिग बॉस मराठीच्या चौथ्या (Bigg Boss Marathi 4) पर्वाच्या विजेत्यांचे नाव जाहीर करण्यात येणार आहे.

हे ही वाचा:

मराठवाड्याची तोफ थंडावली, शेकापच्या केशवराव धोंडगे यांचं निधन

कर्नाटकात स्वबळावर विधानसभा लढवून भाजप पुन्हा सरकार बनवेल, अमित शहांची घोषणा

Bigg Boss 16 ‘या कारणामुळे शो ची पातळी … ‘, घराबाहेर येताच विकास मानकतलाने केला गंभीर आरोप

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version