spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Bigg Boss Marathi 4 : मिरचीची धुरी, पाणी, तेल… टास्कमध्ये होणार खुल्ला राडा!

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम ‘बिग बॉस मराठी’चा (Bigg Boss Marathi 4) चौथा सीझन आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सीझनमधील स्पर्धकांमुळे, त्यांच्यात होणाऱ्या वादामुळे हा शो सध्या चर्चेत आहे.

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम ‘बिग बॉस मराठी’चा (Bigg Boss Marathi 4) चौथा सीझन आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सीझनमधील स्पर्धकांमुळे, त्यांच्यात होणाऱ्या वादामुळे हा शो सध्या चर्चेत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर हे करतात . बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 4) चौथ्या पर्वाची चाहत्यांमध्ये क्रेझ आहे. हा कार्यक्रम वादग्रस्त असला तरी तितकाच लोकप्रिय आहे. स्पर्धकांच्या वादामुळे हे पर्व आणखीनच रंगले आहे. सध्या बिग बॉसच्या घरात ‘खुल्ला करायचा राडा’ हे कार्य रंगत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

 तेजस्विनी आणि अमृता धोंगडे नवी खेळी आखणार आहेत. प्रोमोमध्ये तेजस्विनी म्हणते आहे,”आता सगळं सामान इकडेतिकडे आहे. तू जे तेल बोलते ना ते वापरूया पण…”. यावर अमृता म्हणते आहे,”सामान आणण्यासाठी आपण यशश्रीला ठेवण्याचा प्रयत्न करूया”. यावर तेजस्विनी म्हणते,”खाली कोणी तरी लागणार आत वेगळा माणूस नाही जाऊ शकत”. त्यावर अमृता म्हणते,”तू नसशील तेव्हा मी असेनच ना आणि मग तू संचालक व्हायचं. कोण आत जाणार ? कोण सामान आणणार ? कोण टार्गेट करणार?”. अशा चर्चा दोघींमध्ये सुरू असल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

 ‘खुल्ला करायचा राडा’ या टास्कदरम्यान कोणाचा कोणासोबत वाद होणार आणि कोणती टीम जिंकणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. सध्या घरात स्नेहलता वसईकरची वाइल्ड कार्ड एन्ट्री झाल्याने ती कसा खेळ खेळते याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. खुल्ला करायचा राडा’ या कार्यादरम्यान तेजस्विनी आणि अमृता धोंगडे नवी खेळी करताना दिसणार आहेत. नुकताच या कार्यक्रमाचा प्रोमो आऊट झाला आहे. प्रोमोमध्ये घरातील सदस्य मिरचीची धुरी, पाणी, तेल या सगळ्याचा वापर करत टास्क खेळताना दिसत आहेत. सध्या या टास्कचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हे ही वाचा:

तुम्ही हिंदू म्हणून आवाज उठवा, एकत्र या, तुम्हाला पुढे कसं सुखरुप घरी पाठवायचं हे… ; नितीश राणे

वेदांता प्रकल्पाबाबत RTI अंतर्गत समोर आलेली माहिती चुकीची असल्याचे ठाकरे गटाचा दावा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss