Bigg Boss Marathi 4 : किरण माने आणि प्रसाद जावडे यांच्यातील वाद मारामारीपर्यंत पोहोचला ? पहा नेमक काय झालं.

Bigg Boss Marathi 4 : किरण माने आणि प्रसाद जावडे यांच्यातील वाद मारामारीपर्यंत पोहोचला ? पहा नेमक काय झालं.

बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi ) या कार्यक्रमाला प्रेक्षकांच कमालीचं प्रेम आणि प्रतिसाद मिळालं आहे. तर या कार्यक्रमाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अलीकडेच बिग बॉसच्या घरात नॉमिनेशन प्रक्रिया पार पडताना दिसली तर स्पर्धक एकमेकांवर जोरदार टीका करताना दिसले.नॉमिनेशन प्रक्रियेत सहभागी न होऊ शकणाऱ्या सदस्यांमध्ये अमृता देशमुख, प्रसाद, अमृता धोंगडे,यांच्यासह अनेक सदस्य प्रक्रियेत सहभागी होऊ शकले नाही. तर यांमधील काही कलाकार घराबाहेर देखील जाणार आहेत. पण नुकत्याच रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये असे दिसून येत आहे की या नॉमिनेशन प्रक्रियेनंतर किरण माने (Kira Mane) आणि प्रसाद जावडे (Prasad Jawde) यांच्यात जोरदार वाद झाल्याचे दिसून आले आहे.

प्रसिद्ध वाहिनी कलर्स मराठी ने नुकताच बिग बॉस मराठीचा नवीन प्रोमो शेअर केला आहे. त्यात असे दिसत आहे की बिग बॉसच्या घरात जोरदार वाद झाले आहेत. आणि हा प्रोमो चांगलाच चर्चेत आहे. नॉमिनेशन प्रक्रियेनंतर घरातील सर्वच सदस्य चांगलेच तणावात आहेत. तर घरातील वातावरण देखील तणावाचं दिसत आहे. तेवढ्यातच प्रसाद मानेने किरण प्रसादला सांगितलं की ‘सगळ्याचा डिप्रेशनचा ठेका घेतला आहेस का तू ? किरण माने यांनी प्रसादच्या वक्तव्यावर चिडून प्रतिक्रिया दिली की ‘त्यांनी नाही घेतला,पण जे समोर दिसत आहे तेच सांगतो आहे. काही विमझिकल लोकांना शनिवारी ठरवून डिप्रेशन येतं आणि रविवारी ते जातं’. असे किरण माने यांनी सांगितलं. नंतर प्रसादनेही प्रतिक्रिया देत सांगितलं की ‘ ‘तू कोण आहेस ठरवणारा विमझिकल वगैरे? डॉक्टर आहेस का तू? यावेळेस दोघेही एकमेकांच्या अगदी समोरासमोर होते. काही क्षण असे वाटल की दोघांच्यात मारामारीचे होणार आहे.

त्यामुळे असे दिसत आहे की किरण माने आणि प्रसाद जावडे यांच्यात आज जोरदार वाद झाले आहेत. पण यावर आता घरातील इतर सदस्य काय प्रतिक्रिया देणार आहेत आणि हा वाद अजून किती वाढणार आहे हे लवकरच पुढील एपिसोडमध्ये आपल्याला कळणार आहे.

हे ही वाचा : 

नरेंद्र मोदींविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस नेत्याला अटक

Rajpal Yadav शूटिंगदरम्यान विद्यार्थ्याला मारहाण, शिवीगाळ केल्या प्रकरणी अभिनेता राजपाल यादवविरोधात तक्रार दाखल

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version