spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Bigg Boss Marathi 4 : बिग बॉसच्या घरात गटबाजीला सुरुवात

बिग बॉस मराठीच्या घरात आता खरी रंगत येऊ लागली आहे. केवळ वादच नाही तर नवनवीन टास्क आणि ट्विस्टही येत आहेत. बिग बॉस मराठीचे चौथे पर्व सुरू झाल्या झाल्या दोनच दिवसात वाद आणि भांडणांना सुरुवात झाली. शिवाय टास्क, नाच-गाणी, गॉसिप, कॅप्टनसी टास्क यामुळ प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन होत आहे.

बिग बॉस मराठीच्या घरात आता खरी रंगत येऊ लागली आहे. केवळ वादच नाही तर नवनवीन टास्क आणि ट्विस्टही येत आहेत. बिग बॉस मराठीचे चौथे पर्व सुरू झाल्या झाल्या दोनच दिवसात वाद आणि भांडणांना सुरुवात झाली. शिवाय टास्क, नाच-गाणी, गॉसिप, कॅप्टनसी टास्क यामुळ प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन होत आहे. गेली ९ दिवस १६ स्पर्धकांनी मिळून घरात आपापले स्थान निर्माण केले आहे. असे असले तरी अद्याप बिग बॉस मराठीच्या घरात गटबाजीचे राजकारण सुरू झालेले नाही. परंतु लवकरच त्याचीही सुरुवात होणार आहे. बिग बॉसच्या घरात लवकरच गट पडतील असे दिसते आहे. कारण एकीकडे किरण माने म्हणतात, याला ग्रुप मध्ये घेणं म्हणजे… बावळटपणा काही अर्थच नाही तर दुसरीडे प्रसाद त्याच्या टीमला बोलतो, “त्यांच्याकडे.. युनिटी अजिबात नाहीये…

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांचे गट बनणे हे अगदीच साहजिक आहे पण किती ते टिकतील हे मात्र वेळच ठरवते. असाच एक गट आता घरामध्ये बनेल असे दिसते आहे. किरण माने, अमृता धोंगडे, अमृता देशमुख, तेजस्विनी, योगेश, विकास आणि निखिल यांच्यामध्ये आज चर्चा रंगणार आहे. ज्यामध्ये अमृता धोंगडे म्हणाली, “टीम म्हणून माझं म्हणणं आहे.. आपण टीम म्हणून खेळलो, तो आपल्या टीमचा माणूस होता त्याला विचारलं.. तो नाही आला संपला विषय..” तर किरण माने यांचं म्हणणं आहे, “त्याला कळलं आपण उघडे पडणार म्हणून तो पळतो आहे. काल पहिली फेरी झाल्या झाल्या मी याला (विकासला ) म्हणालो, याचा गेम सुरु झाला, याला ग्रुप मध्ये घेणं म्हणजे… बावळटपणा काही अर्थच नाही तो कोणाचं ऐकूनच घेत नाही.” त्यावर निखिल राजेशिर्के म्हणाला, आता अजून एक विचारायचं आहे, यापुढे कुठले टीम टास्क आले तर आपण एकत्र टीम म्हणून खेळायचं का?.. तर किरण माने तेजस्विनीला म्हणाले, “तू मला झिरो ठरवून देखील मी तुला सेफ केलं नॉमिनेशनमध्ये, माझ्या मनात राग नाही” आणि “अमृता मी माझी कॅप्टन्सी तुला वाचवण्यात घालवली, तो निर्णय वेगळा होता, त्यावेळेस मी तुम्हांला सिग्नल देतं होतो पण तुम्ही ऐकत नव्हता..” या चर्चा पाहून सगळेच अवाक झाले आहेत. या चर्चा वरवर सहज वाटत असल्या तरी बिग बॉस मराठीच्या घरात या चर्चा मोठं राजकारण घडवणार आहेत हे मात्र नक्की.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

 तसेच बिग बॉस मराठीच्या घरामध्ये ‘गेले उडत’ हे साप्ताहिक कार्य सुरू आहे. या कार्यात हे विमान सदस्यांना घेऊन जाणार आहे दुसऱ्या आठवड्याच्या कॅप्टन पदाच्या उमेदवारीकडे. या कार्यामध्ये देखील सदस्यांची कसोटी लागणार आहे. त्यामुळे दुसऱ्या आठवड्यात कोणाला मिळणार कॅप्टन पद हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुकता आहे. या कार्या दरम्यान सदस्यांमध्ये प्रचंड राडे आणि भांडणं होत आहेत.. तर काही सदस्य समजूतदारपणा दाखवून माघार घेत आहेत. याच विषयी चर्चा सुरु असताना आजच्या भागात पाहायला मिळणार आहे. यावेळी अक्षय म्हणतो, “आपण समृद्धीचं कौतुक करूया कारण तिने सगळ्यात पहिले निर्णय घेतला की, मी कॅप्टन झाले मी बाहेर जाते. यावर अपूर्वा यशश्रीला सांगिते, “जे काही कार्यात होते ते तिथेच सोडून यायचं. कुठलं पण काहीपण असूदे…” तर दुसरीकडे प्रसाद त्याच्या टीमला बोलतो, “त्यांच्याकडे.. युनिटी अजिबात नाहीये…” तर रुचिरा तिकडे टीमला सांगताना दिसते की ” युनिटी असणं खूप गरजेच आहे, ती आहेच आणि ती असणारच पण आपण सगळेजण एका पेजवर असणे गरजेचे आहे,” त्या,मुळे कॅप्टनसी मिळवणं हा मोठा अटीतटीचा प्रश्न झाला आहे. आता कोण कुणावर भारी पडतय हे आजच्या भागात कळेल.

हे ही वाचा :

Bigg Boss Marathi 4 : बिग बॉसच्या घरात पडली वादाची ठिणगी; ‘ए किरण माने, तुला..’

Har Har Mahadev Trailer: ‘हर हर महादेव’चा ट्रेलर झाला रिलीज, बाजी प्रभूंच्या स्टाईलमध्ये शरद केळकरांची गर्जना

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss