Bigg Boss Marathi 4 घरातील सदस्यांना बसला धक्का, ‘हे’ सदस्य होणार बाहेर

Bigg Boss Marathi 4  घरातील सदस्यांना बसला धक्का, ‘हे’ सदस्य होणार बाहेर

बिग बॉस मराठी हा कार्यक्रम महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम आहे. अलीकडेच बिग बॉसच्या घरात वाईल्डकार्ड एंट्रीने चार सदस्यांची भर पडली होती. या सदस्यांच्या येण्याने घरातील वातावरण जरा बदलताना दिसले होते. तर घरातील इतर सदस्यांमधील एकमेकांशी असलेले संबंध देखील जरा चांगले झाले होते. अपूर्वा, प्रसाद, रोहित आणि अमृता देशमुख हे चार सदस्य नॉमिनेटेड होते. त्यांच्यापैकी रोहित शिंदेला घराबाहेर पडावे लागले आहे. हे कळताच घरातील सर्व सदस्यांना मोठा धक्का बसला आहे.

या आठवड्यात बिग बॉसच्या घरात रुचिरा जाधव आणि तिचा बॉयफ्रेंड रोहित शिंदे यांची खूप मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. काही दिवसांपूर्वीच रुचिरा घराच्या बाहेर गेली होती तर आता बिग बॉसने ऋतुराजला देखील घराबाहेर काढण्याची घोषणा केली आहे. रुचिरा घराबाहेर पडल्यानंतर रोहितचं काय होणार असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. पण आता महिन्याभरातच रोहित देखील घराबाहेर पडला आहे. विशालसोबत मीरा देखील बाहेर पडणार असल्याचे कळले आहे. जेव्हा बिग बॉस मराठीचे होस्ट महेश मांजरेकर यांनी विशाल आणि मीरा यांना घरातून बाहेर येण्यास सांगितले आणि म्हणाले की विशाल आणि मीरा हे दोघे एकाच आठवड्यासाठी घरात होते. तरीदेखील या आठवड्यात एक सदस्य घराबाहेर देखील जाणार हे निश्चित असं म्हणत त्यांनी रोहित शिंदेचं नाव जाहीर केलं.

रोहित शिंदे हा एक मोठा मॉडेल आहे. त्याहूनही महत्वाचं म्हणजे रोहित एक डॉक्टर देखील आहे. पण मॉडलिंगची आवड असल्यामुळे तो या क्षेत्रात उतरला होता. तसेच त्याला मॉडेलिंगमध्ये चांगले यश देखील मिळाले आहे. विशालने आतापर्यंत मिस्टर इंडिया मॅन ऑफ द ग्लोब इंटरनॅशनल’साठी मॉडेलिंग केलं आहे. तसेच मॉडलिंगसाठी फिटनेशी तितकीच महत्वाची असते त्यामुळे विशालने फिटनेस कडे विशेष लक्ष केंद्रित केले होते. तर आता डॉक्टर रोहित शिंदे घराबाहेर पडल्यावर काय प्रतिक्रिया देतो याविषयी सगळ्यांनाच उत्सुकता होती. कारण त्याची गर्लफ्रेंड रचिरा जाधव दोन आठवड्यापूर्वीच घराबाहेर पडली होती ती त्याच्यावर रागावली होती . त्यानंतर तिनं मीडियाला दिलेल्या अनेक मुलाखतीत रोहित विरोधात नाराजी व्यक्त केली होती. आता रोहितला याविषयी घराबाहेर पडल्यावर केलेत त्यानंतर त्याची प्रतिक्रिया काय असेल. आणि त्यामुळे त्याच्या घराबाहेर पडल्या नंतरच्या पहिल्या पोस्टकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे. नुकतच रोहितने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने सगळ्या त्याच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत.

हे ही वाचा : 

सोनाली कुलकर्णीचे लंडन मधील काही खास फोटो

केंद्रीय विद्यालयात तेरा हजारहून अधिक रिक्त जागा, 12वी उत्तीर्ण असलेल्यां देखील संधी, पगार असेल…

कर्नाटक- महाराष्ट्र सीमाप्रश्न सोडवण्यासाठी संयमी मार्गाने पुढं जाऊ- शंभुराज देसाई

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version