Bigg Boss Marathi 4  : मराठी बिग बॉसच्या घरात मुख्यमंत्री शिंदेंच्या नावाची हवा, महेश मांजरेकरांचं मोठे वक्तव्य

Bigg Boss Marathi 4  : मराठी बिग बॉसच्या घरात मुख्यमंत्री शिंदेंच्या नावाची हवा, महेश मांजरेकरांचं मोठे वक्तव्य

कलर्स मराठी वाहिनीवरील सर्वात वादग्रस्त तरीही लोकप्रिय शो म्हणून ओळखला जाणारा बिग बॉस मराठी कायम प्रचंड चर्चेत असतो. प्रेक्षकांना नव्या सीजनची उत्सुकता असते. तर काल रविवार २ ऑक्टोबरपासून ‘बिग बॉस मराठी’चे चौथे पर्व सुरु झाले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत. या पर्वाचा ग्रँड प्रीमीयर कलर्स मराठीवर प्रसारित झाला. आतापर्यंत बिग बॉसच्या घरात प्रसिद्ध कलाकारांनी हजेरी लावली आहे. त्यांच्यासह मराठी अभिनेता अक्षय केळकरने बिग बॉसच्या घरात एंट्री घेतली आहे. यावेळी बिग बॉसच्या मंचावर महेश मांजरेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचा उल्लेख केला.

हेही वाचा : 

Dasara Melava : दसरा मेळाव्याची जोरदार तयारी; ठाकरे गटाकडून दादर, वरळी परिसरात बॅनरबाजी

यंदा बिग बॉसच्या घरात एकूण १६ स्पर्धक आले आहेत. त्यात अक्षय केळकरने एंट्री केल्यानंतर त्याला होस्ट महेश मांजरेकर यांनी ‘आता इथंपर्यंत कसा आलास?’ असा प्रश्न केला होता. यावर उत्तर देताना अक्षय केळकरने “मी बाबांच्या रिक्षातून आलोय. मी एक अभिनेता असलो तरी माझे बाबा आजही रिक्षा चालवतात. मी कितीही कमावत असलो तरी त्यांना रिक्षा चालवायचीच आहे असं ते सांगतात.” असं म्हटलं होतं. यानंतर महेश मांजरेकर यांनी त्याच्या बाबांचं कौतुक करत बिग बॉसच्या मंचावर बोलावलं.

अक्षय केळकरचे बाबा भावूक झाले…

मांजेकर यांनी अक्षय केळकरच्या बाबांना प्रश्न विचारला की, “मुलगा एवढा कमावतो. आता त्याच्या करिअरमध्येही स्थैर्य आलंय मग तुम्ही रिक्षा का चालवता. आता निवृती घ्या ना. असा सल्ला दिला. यावर अक्षयचे बाबांनी, नाही मी रिक्षा चालवणं कधीच सोडणार नाही. त्याने माझं आरोग्य चांगलं राहातंय. असं उत्तर दिलं.

PFI : पीएफआयचा मोठा कट उघडकीस

Aत्यांचे उत्तर ऐकताच व्वा, कोणतंही काम उच्च किंवा कमी दर्जाचं नसतं. आता आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही कधी काळी रिक्षा चालवत होते. त्यांचा रिक्षावाला ते राज्याचा मुख्यमंत्री हा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. एक दिवस तुमचा मुलगाही खूप यशस्वी होईल. अशा शब्दात मांजरेकर यांनी बिग बॉसच्या मंचावर मुख्यमंत्री शिंदेंचे कौतुक केले.

Navratri 2022 : मुलुंडमध्ये गरबा खेळताना तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

Exit mobile version