Bigg Boss Marathi 4 : स्नेहलता वसईकरची पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री

'बिग बॉस मराठी 4' (Bigg Boss Marathi 4) हा छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय कार्यक्रम आहे. काल बिग बॉसच्या घरातले तिसरे एलिमिनेशन झाले. योगेश जाधव ने बिग बॉसच्या घराचा निरोप घेतला. त्याच्या शिव्या आणि त्याची अर्वाच्य भाषा यामुळे तो त्याला घराबाहेर पडावे लागले.

Bigg Boss Marathi 4 : स्नेहलता वसईकरची पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री

‘बिग बॉस मराठी 4’ (Bigg Boss Marathi 4) हा छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय कार्यक्रम आहे. काल बिग बॉसच्या घरातले तिसरे एलिमिनेशन झाले. योगेश जाधव ने बिग बॉसच्या घराचा निरोप घेतला. त्याच्या शिव्या आणि त्याची अर्वाच्य भाषा यामुळे तो त्याला घराबाहेर पडावे लागले. कालच्या एलिमिनेशन नंतर खरं तर घरात 13 सदस्य उरणार होते पण बिग बॉस ने एक मोठा गेम केला आणि अचानक एक वाइल्ड कार्ड सदस्य घरात आणला. या पर्वात आता स्नेहलता वसईकरची (Snehlata Vasaikar) पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे.

विकास आणि योगेश डेंजर झोनमध्ये होते. ज्यामधून योगेशला घर सोडावं लागलं. तर दुसरीकडे बिग बॉस मराठीच्या घरामध्ये या पर्वातली पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. स्नेहलता वसईकरच्या येण्याने घरातील समीकरण किती बदलतील? नात्यांमध्ये काय बदल होतील? कोण घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत येईल आणि कोण सेफ होईल? कोण होईल घराचा नवा कॅप्टन? म्हणजेच येणारा आठवडा खूप आव्हानात्मक आणि उत्कंठावर्धक असणार यात शंका नाही.

स्नेहलता वसईकरने अनेक मालिका आणि सिनेमांत काम केलं आहे. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या ऐतिहासिक मालिकेत स्नेहलता सोयरा बाईसाहेबांच्या भूमिकेत दिसून आली होती. या मालिकेमुळे स्नेहलता घराघरांत पोहोचली. तिची ही भूमिका चांगलीच गाजली. स्नेहलता वसईकर तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे अनेकदा चर्चेत असते. बोल्ड फोटोशूटमुळे नेटकरी तिला अनेकदा ट्रोल करत असतात.

बिग बॉस मराठीच्या चावडीमध्ये महेश मांजरेकरांनी किरण मानेची चांगलीच कानउघडणी केली आहे. चावडीवर त्यांनी बऱ्याच सदस्यांची शाळा घेतली. कोण कुठे चुकले, कोण बरोबर खेळले सगळ्याचा हिशोब घेतला. सदस्यांच्या वर्तणुकीसाठी त्यांनी स्पर्धकांना चांगलंच सुनावले.

‘बिग बॉस मराठीच्या’ चौथ्या पर्वात १६ स्पर्धक सहभागी झाले होते. यातून निखिल राजेशिर्के आणि मेघा घाटगेला घराबाहेर जावे लागले होते. आता योगेश जाधवदेखील घराबाहेर पडला आहे. पण स्नेहलता वसईकरच्या एन्ट्रीने घरातील वातावरण आनंदमय झाले आहे. स्नेहलता वसईकर बिग बॉस मराठीचा खेळ कसा खेळणार याकडे आता चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version