Bigg Boss Marathi 4 : बिग बॉसच्या घरात पडली वादाची ठिणगी; ‘ए किरण माने, तुला..’

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम 'बिग बॉस मराठी'चा(Bigg Boss Marathi 4) चौथा सीझन आता प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या सीझनमधील स्पर्धकांमुळे, त्यांच्यात होणाऱ्या वादामुळे हा शो सध्या चर्चेत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर हे करतात.

Bigg Boss Marathi 4 : बिग बॉसच्या घरात पडली वादाची ठिणगी; ‘ए किरण माने, तुला..’

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम ‘बिग बॉस मराठी’चा(Bigg Boss Marathi 4) चौथा सीझन आता प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या सीझनमधील स्पर्धकांमुळे, त्यांच्यात होणाऱ्या वादामुळे हा शो सध्या चर्चेत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर हे करतात. वीकेंडला होणाऱ्या चावडीमध्ये महेश हे स्पर्धांसोबत चर्चा करतात. आता नुकताच या कार्यक्रमाच्या आजच्या भागाचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की बिग बॉसच्या घरातील काही स्पर्धक एकमेकांसोबत भांडत आहेत.

बिग बॉस मराठीच्या घरात आता वातावरणं तंग होत चाललंय. वाद हळूहळू डोकं वर काढतायत. आतापर्यंत घरातल्या सदस्यांचा कोणालाच अंदाजा लागत नव्हता, कोण कसं आहे हे काही केल्या कळत नव्हतं. काही टी.व्ही कलाकार आधीपासून माहीत होते खरे पण प्रत्यक्षात ते गेम खेळताना कसे वागतील याविषयी सर्वसामान्य प्रेक्षकांना अंदाज लागत नव्हता. आता बिग बॉसचं घर म्हटलं की कुणाला आवडेल नुसतं गुळमुळीत सगळं पहायला, वाद नसतील तर काय मज्जा, नाही का. शेवटी ही सर्वसामान्य प्रवृत्तीच असते,स्वतःचं ठेवावं झाकून अन् दुसऱ्याचं पहावं वाकून…

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज सदस्यांमध्ये होणार तुफान राडा. प्रोमोमध्ये दिसत आहे की, किरण माने विकासला म्हणाले “अरे तू शेपूट आहेस, आहेस का?” आणि इथून घरात वादाची ठिणगी पडली. मेघा घाडगे म्हणाल्या, “हे शब्द बोलायची गरज आहे का ? जो बोलतो आहे त्याला बोलत नाही आहेस तू.’ किरण माने म्हणाले, “तो किती सहन करणार ? चार पाच दिवस सहन करतो आहे तो.’ त्यावर अपूर्वा भडकली. ती म्हणाली, ‘ए किरण माने तो त्याचं बोलेल ना, तुला काय गरज आहे?’ आणि भांडणं वाढतंच गेलं.

हे ही वाचा :

सर्व केंद्रीय विद्यापीठांमध्ये, उच्च संस्थांमध्ये हिंदीचा वापर बंधनकारक करा, अमित शाह यांची समितीला शिफारस

चिन्ह आणि नावावर शिंदे गटाचे नरेश म्हस्के आणि भारत गोगावले यांची प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version