बिग बॉस हा मराठीतील एक बहुचर्चित आणि प्रसिद्ध असा एक कार्यक्रम आहे. बिग बॉस हा कार्यक्रम नेहमीच कार्यक्रमातील ड्रामा, भांडण, टास्क आणि स्पार्धकांमुळे चर्चेत असतो आणि कार्यक्रमाच्या याच वेगळेपणमुळे हा कार्यक्रम टीआरपीच्या रेसमध्येदेखील पुढे असतो. ‘बिग बॉस मराठी’चे चौथे (Bigg Boss Marathi 4) पर्व सुरु व्हायला आता अवघे दोन दिवस राहिले आहेत. त्यामुळे या वादग्रस्त कार्यक्रमाची आता चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. यंदाच्या पर्वात कोण कोण असणार याची उत्सुकता सगळ्यांनाच असून, काही नावे देखील चर्चेत आहेत. तर, आता प्रेक्षकांची उत्सुकता आणखी ताणून धरण्यासाठी कलर्स मराठी वाहिनीच्या सोशल मीडिया पेजवर ‘बिग बॉस मराठी सीझन ४’चे प्रोमो आणि टीझर पोस्ट करण्यात आले आहे. यात प्रीमिअरची झलक पाहायला मिळतेय. मात्र, या प्रोमोंवर प्रेक्षक नाराज झाले आहेत.
View this post on Instagram
बिग बॉस मराठी ४ च्या ग्रँड प्रीमियरची पहिली झलक समोर आली आहे. ज्यात बिग बॉसच्या घरात जाणाऱ्या अभिनेत्रीचा चेहरा समोर आला आहे. अभिनेत्री बिग बॉसच्या घरातील दणक्यात एंट्री होणार आहे. अत्यंत बोल्ड असा तिचा अंदाज दाखवण्यात आला आहे. ‘मोहे अंग लगादे’ या गाण्यावर डान्स करत अभिनेत्री प्रेक्षकांसमोर येणार आहे. अभिनेत्रीनं प्रोमोमध्येच प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरली आहे. पण बिग बॉसच्या घरात जाणारी ही अभिनेत्री नेमकी कोण आहे हे काही कळू शकलेलं नाहीये. अभिनेत्रीचा चेहरा नीटसा काही दिसत नाहीये. पण प्रेक्षकांनी मात्र तिला पाहून अंदाज लावला आहे. बिग बॉसच्या घरात ही अभिनेत्री नेहा खान आहे असं अनेकांचं म्हणणं आहे. नेहा खान म्हणजेच लोकप्रिय ‘देवमाणूस’ या मालिकेतील पोलीस ऑफिसर दिव्या सिंग. ही नेहा खानच असणार असं अनेक प्रेक्षकांनी म्हटलं आहे. नेहाला बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वासाठी देखील विचारणा करण्यात आली होती. मात्र तेव्हा मालिका सुरू असल्यानं नेहानं ऑफर नाकारली होती. पण ती चौथ्या पर्वात दिसणार अशी चर्चा मागेही सुरू होती, या प्रोमोने ती अधिकच स्पष्ट झाली.
हा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. शोच्या प्रोमोमध्ये स्पर्धक म्हणून सामील होणाऱ्या अभिनेत्री तोकड्या कपड्यांमध्ये हिंदी गाण्यांवर नृत्य करताना दिसत आहेत. हे पाहून आता मराठी प्रेक्षक आणि चाहते संतापले असून, त्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. एका चाहत्याने लिहिले की, ‘मराठी गाणी मिळत नाही का ? हिंदी गाणी का घेतात?’. तर दुसऱ्या एकाने लिहिले की, ‘हा काय डान्स करतात या अर्धवट कपडे घालून. या पैशासाठी व प्रसिद्धीसाठी काहीपण घालतात व कसा पण विक्षिप्त डान्स करतात. यांना स्टेजवर आणून प्रोत्साहन देणारे मेकर्सही विक्षिप्तच असले पाहिजेत.’ तर अजून एक चाहत्याने कंमेंट केली आहे कि, ‘जरा मराठी संस्कृतीला शोभतील असे लोक आणा’, असा सल्ला देखील काही चाहत्यांनी दिला आहे. ‘दिलखेचक नाही दिलटोचक वाटतेय अदाकारी’, असे देखील एकाने म्हटले आहे. तर, ‘असे घाणेरडे डान्स कृपया दाखवू नये..आम्ही सर्व जण सोबत tv बघतो. खूप खराब वाटतं..माझा लहान मुलगासुद्धा हे बघतो.. हा डान्स तो हसत होता…मी काहीच बोलू शकले नाही.. त्यातही स्वामी समर्थ सिरीयलच्यामध्ये ही विक्षिप्त जाहिरात आली..कृपया भान ठेवावं’, असं म्हणत एका चाहतीने या प्रोमोवर आपली नाराजी व्यक्त केली आहे.
हे ही वाचा:
प्रेक्षकांची प्रतीक्षा संपणार; बिग बॉस मराठीचा ४था सीजन लवकरच सुरु होणार
बिग बॉस मराठी 4चं होस्टिंग करणार ‘हा’ सुपरस्टार अभिनेता