Bigg Boss Marathi 4 :  ‘मराठी बिग बॉस’च्या प्रोमोवर प्रेक्षक नाराज!

बिग बॉस हा मराठीतील एक बहुचर्चित आणि प्रसिद्ध असा एक कार्यक्रम आहे. बिग बॉस हा कार्यक्रम नेहमीच कार्यक्रमातील ड्रामा, भांडण, टास्क आणि स्पार्धकांमुळे चर्चेत असतो आणि कार्यक्रमाच्या याच वेगळेपणमुळे हा कार्यक्रम टीआरपीच्या रेसमध्येदेखील पुढे असतो.

Bigg Boss Marathi 4 :  ‘मराठी बिग बॉस’च्या प्रोमोवर प्रेक्षक नाराज!

बिग बॉस

बिग बॉस हा मराठीतील एक बहुचर्चित आणि प्रसिद्ध असा एक कार्यक्रम आहे. बिग बॉस हा कार्यक्रम नेहमीच कार्यक्रमातील ड्रामा, भांडण, टास्क आणि स्पार्धकांमुळे चर्चेत असतो आणि कार्यक्रमाच्या याच वेगळेपणमुळे हा कार्यक्रम टीआरपीच्या रेसमध्येदेखील पुढे असतो. ‘बिग बॉस मराठी’चे चौथे (Bigg Boss Marathi 4) पर्व सुरु व्हायला आता अवघे दोन दिवस राहिले आहेत. त्यामुळे या वादग्रस्त कार्यक्रमाची आता चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. यंदाच्या पर्वात कोण कोण असणार याची उत्सुकता सगळ्यांनाच असून, काही नावे देखील चर्चेत आहेत. तर, आता प्रेक्षकांची उत्सुकता आणखी ताणून धरण्यासाठी कलर्स मराठी वाहिनीच्या सोशल मीडिया पेजवर ‘बिग बॉस मराठी सीझन ४’चे प्रोमो आणि टीझर पोस्ट करण्यात आले आहे. यात प्रीमिअरची झलक पाहायला मिळतेय. मात्र, या प्रोमोंवर प्रेक्षक नाराज झाले आहेत.

हा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. शोच्या प्रोमोमध्ये स्पर्धक म्हणून सामील होणाऱ्या अभिनेत्री तोकड्या कपड्यांमध्ये हिंदी गाण्यांवर नृत्य करताना दिसत आहेत. हे पाहून आता मराठी प्रेक्षक आणि चाहते संतापले असून, त्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. एका चाहत्याने लिहिले की, ‘मराठी गाणी मिळत नाही का ? हिंदी गाणी का घेतात?’. तर दुसऱ्या एकाने लिहिले की, ‘हा काय डान्स करतात या अर्धवट कपडे घालून. या पैशासाठी व प्रसिद्धीसाठी काहीपण घालतात व कसा पण विक्षिप्त डान्स करतात. यांना स्टेजवर आणून प्रोत्साहन देणारे मेकर्सही विक्षिप्तच असले पाहिजेत.’ तर अजून एक चाहत्याने कंमेंट केली आहे कि, ‘जरा मराठी संस्कृतीला शोभतील असे लोक आणा’, असा सल्ला देखील काही चाहत्यांनी दिला आहे. ‘दिलखेचक नाही दिलटोचक वाटतेय अदाकारी’, असे देखील एकाने म्हटले आहे. तर, ‘असे घाणेरडे डान्स कृपया दाखवू नये..आम्ही सर्व जण सोबत tv बघतो. खूप खराब वाटतं..माझा लहान मुलगासुद्धा हे बघतो.. हा डान्स तो हसत होता…मी काहीच बोलू शकले नाही.. त्यातही स्वामी समर्थ सिरीयलच्यामध्ये ही विक्षिप्त जाहिरात आली..कृपया भान ठेवावं’, असं म्हणत एका चाहतीने या प्रोमोवर आपली नाराजी व्यक्त केली आहे.

हे ही वाचा:

प्रेक्षकांची प्रतीक्षा संपणार; बिग बॉस मराठीचा ४था सीजन लवकरच सुरु होणार

बिग बॉस मराठी 4चं होस्टिंग करणार ‘हा’ सुपरस्टार अभिनेता

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version