Bigg Boss marathi 4: बिग बॉसच्या घरातील कॉमन मॅन झाला आउट; त्रिशूल मराठेने घेतला घराचा निरोप

'बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi) हा छोट्या पडद्यावरचा वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय कार्यक्रम आहे. पण बिग बॉसच्या चौथ्या पर्वाची क्रेझ आता कमी झाली आहे.

Bigg Boss marathi 4: बिग बॉसच्या घरातील कॉमन मॅन झाला आउट; त्रिशूल मराठेने घेतला घराचा निरोप

‘बिग बॉस मराठी’ (Bigg Boss Marathi) हा छोट्या पडद्यावरचा वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय कार्यक्रम आहे. पण बिग बॉसच्या चौथ्या पर्वाची क्रेझ आता कमी झाली आहे. टीआरपीच्या शर्यतीतदेखील हा कार्यक्रम मागे पडला आहे. अशातच गेली काही दिवस कोणत्याच वादात किंवा चर्चेत नसणाऱ्या त्रिशूल मराठेला काल निरोपाचा नारळ देण्यात आला.

बिग बॉसच्या घरात नेहमीच स्पर्धक म्हणून सेलिब्रिटी सहभागी होत असतात. पण या पर्वात पहिल्यांदाच सामान्य नागरिक म्हणून त्रिशूल मराठे सहभागी झाला होता. त्यानिमित्ताने एका सामान्य चाहत्याला पहिल्यांदाच बिग बॉसचा खेळ खेळण्याची संधी मिळाली होती. एअरटेल लकी कॉलरच्या माध्यमातून त्रिशूल मराठेला बिग बॉसच्या चौथ्या पर्वात सहभागी होता आले होते. बिग बॉसच्या पहिल्या आठवड्यात मांजरेकरांचं मन जिंकणारा त्रिशूल दुसऱ्या आठवड्यापासूनच घरात दिसेनासा झाला होता. चावडीवर मांजरेकरांनी त्याला यासंदर्भात माहिती दिली होती. सुरवातीला त्रिशूल चांगला खेळला. पण नंतर मात्र त्याच्याकडून फारसे मनोरंजन झाले नाही आणि अखेर पाच आठवड्यांनी त्याने बिग बॉसच्या घरातून निरोप घेतला. कालच्या भगत त्रिशूल घरा बाहेर पडताना दिसला.

त्रिशूल मराठे सोशल मीडियावर चांगलाच अँक्टिव्ह आहे. बिग बॉसच्या घरात तो सामान्य प्रेक्षक म्हणून सहभागी झाला असला तरी आता मात्र तो सेलिब्रिटी झाला आहे. त्रिशूलला अभिनयाची आवड असल्याने त्याला लवकरच अनेक सिनेमांसाठी विचारणा होऊ शकते.

त्याला निरोप देताना मांजरेकर म्हणाले, ‘एका चांगल्या माणसाला घराबाहेर जावं लागत आहे. तुझ्यासारखा लकी प्रेक्षक बिग बॉसच्या घराचा सदस्य झाला याचा मला आनंद झाला होता.’ त्रिशूल मराठे सामान्य प्रेक्षक म्हणून सहभागी झाला असला तरी आता मात्र तो सेलिब्रिटी झाला आहे. त्रिशूलला अभिनयाची आवड असल्याचे त्याने या शो मध्ये बोलून दाखवले आहे, त्यामुळे आता त्रिशूलच्या आयुष्यात काय बदल घडतोय का, त्याला मालिका, सिनेमांसाठी विचारणा होतेय का ही लवकरच कळेल.

हे ही वाचा :

छगन भुजबळांच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र; नाशिक येथील सिडकोचे कार्यालय…

संभाजी राजेंच्या भूमिकेचं जितेंद्र आव्हाडांनी केलं स्वागत

Mumbai Traffic Updates : अंधेरीतील गोखले पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद; ‘पश्चिम द्रुतगती’साठी सहा पर्याय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version