spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Bigg Boss Marathi 4 : स्पर्धक किरण माने घराबाहेर होताच विकासनं बदलला गेम?, प्रोमो रिलीज

बिग बॉस मराठीच्या ४ पर्वाच्या शनिवारी आणि रविवारी प्रसारित झालेल्या भागांमध्ये एक मोठा ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळाला आहे. आठवड्याअखेरीस भरणाऱ्या चावडीमध्ये सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी या आठवड्यात दोन स्पर्धकांना घराबाहेर जावं लागणार असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे कोणते स्पर्धक घराबाहेर जातात याची उत्सुकता सर्वांनाच होती. शनिवारी स्पर्धक यशश्री मसुरकर घराबाहेर पडल्यानंतर किरण मानेही घराबाहेर जातील असं महेश मांजरेकर यांनी जाहिर केलं आणि किरण मानेंचं नाव ऐकून सर्व स्पर्धकांना आश्चर्याचा धक्का बसला. पण किरण माने घरातून आऊट झालेले नसून सीक्रेट रूममध्ये त्यांची रवानगी करण्यात आली आहे. सीक्रेट रूममध्ये राहून घरातील सदस्य काय काय कारस्थानं करतात? हे किरण यांना सीक्रेट रूममधून पाहता येणार आहे. मात्र यात ट्विस्ट हा आहे की घरातील सदस्यांना किरण माने सीक्रेट रूम मध्ये असल्याचे ठाऊक नसणार. त्यामुळे किरण माने घरातून गेले म्हटल्यावर घरात नवी समीकरणं जुळू लागली आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

हेही वाचा : 

Rohit Sharma Team India : रोहित शर्माने ११ वर्षांपूर्वीच केली होती ‘ही’ मोठी भविष्यवाणी, ट्विट व्हायरल

स्पर्धक किरण माने घराबाहेर पडताच विकास आणि अपूर्वाची मैत्री पाहायला मिळणार आहे. ‘अपूर्वा खूप चांगली आहे,’असं विकास म्हणते,‘ यावर ‘तुझ्याविषयी मला नेहमीच आपुलकी वाटते. तूच माझ्याबाबत अनेक गैरसमज करून घेतले आहेस,’असं अपूर्वा म्हणते. आपली पाठ वळताच अपूर्वा व विकास यांची मैत्री बहरलेली पाहून किरण माने निराश होतात. ‘खूप वाईट वाटतं हो. याला इथपर्यंत आपण बरोबर घेऊन आलो,’ असं ते म्हणताना दिसतो. व्हिडीओत विकास व अपूर्वा एकमेकांना घास भरवताना दिसतात. शिवाय आता माझी काळजी घ्यायला अजून एक माणूस आहे… असं विकास म्हणतो. यावर , पिक्चर अभी बाकी है, असं किरण माने म्हणतात.

World Television Day 2022 : आजच्या दिवसाचं महत्त्व काय आहे तुम्हाला ठाऊक आहे का ?

इतर स्पर्धकांची चांगलीच खरडपट्टी

आठवड्याअखेरील बिग बॉस मराठीच्या घरात मांजरेकरांची चावडी चांगलीच रंगली. शनिवारच्या भागामध्ये मांजरेकरांनी घरातील स्पर्धकांची चांगलीच खरडपट्टी काढली. कोणता सदस्य चांगला खेळला, कोण चुकलं, कोणी टास्क उत्तमरीत्या पार पाडला या सगळ्याचा हिशोब त्यांनी मांडला. हा हिशोब मांडत असताना अमृता धोंगडेलादेखील मांजरेकरांना खडे बोल सुनावले. शनिवारी भागाच्या शेवटी यशश्री मसुरकर ४९ दिवसांचा खेळ खेळून घराबाहेर पडली. त्यानंतर रविवारी प्रसारित झालेल्या भागात अपूर्वा आणि किरण माने यांच्यात जोरदार शाब्दिक वाद झडला.

मराठी संस्कृती, साडी अन् सुप्रिया सुळे! स्पष्टीकरण देत म्हणाल्या…

Latest Posts

Don't Miss