‘बिग बॉस मराठी’ फेम विकास सावंत करतोय ऑलिम्पिकची तयारी, म्हणाला, माझी ताकद…

‘बिग बॉस मराठी’ फेम विकास सावंत करतोय ऑलिम्पिकची तयारी, म्हणाला, माझी ताकद…

बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi) हा कार्यक्रम महाराष्ट्रातील सर्वात सर्वात लोकप्रिय कार्यक्रमांमध्ये मोडतो. बिग बॉस माराठीतील(Bigg Boss Marathi) स्पर्धकांना खूप प्रसिद्धी मिळते. तसेच या स्पर्धकांना त्यांच्या टोपण नावाने देखील अनेक वेळा ओळखले जाते. बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi) चौथ्या पर्वातील छोटा पॅकेट बडा धमाका म्हणून प्रसिद्ध झालेला विकास सावंतने (Vikas Sawant) आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तसाही बिग बॉस मराठीतील (Bigg Boss Marathi) स्पर्धकांची चर्चा ही कायम सुरूच असते. त्यात आता विकासाचा नव्या उपक्रमामुळे मोठया प्रमाणात त्याची चर्चा सुरु आहे. विकास सावंत हा बिग बॉसच्या घरात देखील आक्रमक असेलेला पाहायला मिळाले आहे. तर विकास सावांतच्या ‘बिग बॉसच्या घरातील प्रवास हा अर्ध्यातच संपला. पण आता तो ऑलिम्पिकची (Olympic) तयारी करतो आहे.

बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi) स्पर्धक विकास सावंत (Vikas Sawant) हा ऑलिम्पिक मध्ये भाग घ्यायची इच्छा दर्शवतो आहे. विकास हा ऑलिम्पिकमध्ये थाळीफेक या खेळात भाग घेईल अस अंदाज मांडला जातो आहे. कारण काही दिवसांपूर्वी विकासने समुद्रकिनाऱ्यावर थाळी फेकचा सराव करतानाचा एक व्हिडीओ विकासने शेअर केला होता. या व्हिडीओमधून त्याने ऑलिम्पिकसाठी तयारी करत असल्याचं विकासने सांगितलं होतं. विकास सावंतने एका मुलाखती दरम्यान ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याची इच्छा दर्शवली होती.

या मुलाखतीत विकासने सांगितल होत की, “मी एक ठेंगणा व्यक्ती आहे. माझी उंची कमी आहे. पण मला ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करायचं आहे. माझी ताकद व क्षमता प्रेक्षकांनी बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) घरात पाहिली आहे. आता माझं ध्येय ऑलिम्पिक (Olympic) आहे. मला त्यावर लक्ष केंद्रीत करायचं आहे. ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करुन मला संपूर्ण जगाला माझ्या ताकदीचं प्रदर्शन द्यायचं आहे”. असे म्हणत विकासने ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्याची उच्च व्यक्त केली आहे.

हे ही वाचा:

सत्यजित तांबेंच्या निलंबनानंतर सुधीर तांबेंची पहिली प्रतिक्रिया

उद्धव ठाकरे सोडणार का पक्षप्रमुखपद? ठाकरे गटाने घेतला मोठा निर्णय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version