spot_img
Sunday, September 15, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉसच्या घरात कॅप्टन निवड रेसमध्ये येणार मोठा ट्वीस्ट… बिग बॉसने पलटवला डाव

बिग बॉसच्या घरातील सर्व सदस्य आपला आपला खेळ खेळताना पाहायला मिळत आहेत. रोज नवे राडे आणि नवी भांडणं पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे अनेक नवे ड्रामेही दिसून येतात. टास्कसाठी चांगलीच चढाओढ होताना दिसून येतेय. बिग बॉसने बीबी करन्सीसाठी मानकाप्याच्या टास्क सुरु आहे. या टास्क नंतर घराचा नवा कॅप्टन निवडण्यात येणार आहे. आताची घराची कॅप्टन निकी तांबोळी हिने सर्वांशी वैर घेऊन सर्वाना त्रास देत असताना दिसत आहे.

सध्या बिग बॉसच्या घरात मानकाप्याचा टास्क सुरू आहे. या टास्कसाठी घरातील सदस्यांना जोडीमध्ये बांधून ठेवण्यात आले आहे. टास्कसाठी या जोडयांना एक पट्टा दिला गेला आहे. हा पट्टा वापरूनच त्यांना घरामध्ये वावरायचे आहे. मानकाप्या भूताच्या पाताळलोकातून सोन्याची नाणी आणण्याच्या टास्कमध्ये ग्रुप बी विजयी झाला. त्यानंतर बिग बॉसने विजयी झालेल्या ग्रुपला हरलेल्या ग्रुप ए मधून दोन जोड्यांना कॅप्टन्सी रेसमधून बाहेर काढायला सांगण्यात आले. त्यामुळे ग्रुप बी ने घन:श्याम आणि पॅडी कांबळे व अभिजीत सावंत आणि निक्की तांबोळी यांना आपल्या विशेष अधिकाराने बाहेर काढले. अरबाज पटेलला शिक्षा म्हणून बिग बॉसने आधीच अपात्र ठरवलेले होते.

नव्या कॅप्टनसाठी रेसमध्ये आला ट्विस्ट
कॅप्टन्सी रेसमध्ये कोण जिंकणार आणि कॅप्टन्सी मिळवण्यासाठी कोणता सदस्य कोणाला फेव्हर करणार याकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं आहे. ‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो आला आहे, या प्रोमोमध्ये ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्य कॅप्टनसीसाठीचा टास्क खेळत असताना दिसत आहेत. प्रोमोमध्ये बिग बॉस म्हणत आहेत,”आता वेळ आहे नवा कॅप्टन निवडण्याची”. त्यानंतर बाकीचे सदस्य जान्हवी, अंकिता आणि सूरज हे कॅप्टन पदासाठी कसे योग्य आहेत हे सांगताना दिसून येत आहेत. कॅप्टन्सीच्या पदासाठी मेजॉरिटी असणे गरजेचे असते. पण त्यांच्यात बहुमत होत नसल्यामुळे बिग बॉसने बाहेर बसलेल्या सदस्यांना नवा कॅप्टन निवडण्यास सांगत आहेत. त्यामुळे बिग बॉस मराठी घराचा नवा कॅप्टन कोण असेल हे आता घराबाहेर बसलेले सदस्य म्हणजेच निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, पॅडी कांबळे, घन:श्याम सरोटे हे ठरवणार आहेत.

हे ही वाचा:

भारताला पुढे नेण्याचे काम हे केवळ नरेंद्र मोदी यांनी केले आहे; Devendra Fadnavis

शरद पवारांनी Z+ सुरक्षा घेण्यास दिला नकार, CRPF अधिकाऱ्यांना केले परत, सविस्तर घ्या जाणून

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss