Bigg Boss Marathi Season 5: Sangram Chougule पोस्ट करत म्हणाला, घरातून बाहेर जावं लागलं पण….

Bigg Boss Marathi Season 5: Sangram Chougule पोस्ट करत म्हणाला, घरातून बाहेर जावं लागलं पण….

सध्या घराघरात सर्वात जास्त पाहिला जाणारा कार्यक्रम म्हणजे बिग बॉस मराठी (Big Boss Marathi). एकंदरीत काय तर, कल्ला, गोंधळ आणि आप-आपसातील वाद. यामुळे या कार्यक्रमात अनेक ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत.  त्यातच आता भर पडली होती ती म्हणजे वाइल्ड कार्ड एन्ट्री सभासद संग्राम चौगुले (Sangram Chougule) यांची. पण आता संग्राम चौगुले यांना १४ व्या दिवशीच घराचा निरोप घ्यावा लागला आहे. काही दिवसांपूर्वी, बॉडी बिल्डर संग्राम चौगुले यांनी बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली होती. संग्राम चौगुले यांची वाइल्ड कार्ड द्वारे एन्ट्री झाली होती. कॅप्टन्सी उमेदवारीच्या टास्कदरम्यान त्यांच्या हाताला दुखापत झाली. त्यामुळे त्यांना घरातील कोणतंही काम करता येणार नव्हतं. तसेच ते टास्कमध्ये सहभागी होऊ शकले नसते. त्यामुळेच त्यांना आरोग्याची काळजी घेण्यासाठी घराचा निरोप घ्यावा लागला आहे. घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. दुखापतीमुळे मला बिग बॉसच्या घरातून बाहेर जावं लागत आहे. पण आपली भेट लवकरच होईल. तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी धन्यवाद, असे संग्रामने पोस्टमध्ये म्हटले आहे.

काय आहे संग्रामची पोस्ट?

मला झालेल्या काही Major Injuries मुळे घरातून बाहेर जावं लागलं, तुम्ही आजपर्यंत जे प्रेम दिलं ते मी सोबत घेऊन जातोय आणि तुमच्या सगळ्यांचा प्रेमच मला लवकर Recover व्हायला मदत करेल. Thank you everyone for loving me in the Bigg Boss Marathi house! Your love and support is my powerhouse!

कोण जाणार घराबाहेर? 

बिग बॉस मराठीच्या घरात या आठवड्यात पाच सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. या नॉमिनेशन टास्कमध्ये अरबाज पटेल, निक्की तांबोळी, वर्षा उसगांवकर, सुरज चव्हाण आणि जान्हवी किल्लेकर घराबाहेर पडण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. अशातच आता बिग बॉस मराठी (Big Boss Marathi) च्या घरातील शनिवारच्या भागात पहिला वाईल्ड कार्ड सदस्य बॉडीबिल्डर संग्राम चौगुलेला घराबाहेर जावं लागलं. संग्रामला कॅप्टन्सी टास्कमध्ये चांगलीच दुखापत झाली होती. संग्रामच्या हाताला इतकी दुखापत झाली होती की, त्याला बिग बॉसच्या घरातील पुढील टास्क खेळणं शक्य झालं नसतं. हाताला  झालेल्या दुखापतीमुळे संग्राम चौगुलेला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावं लागलं. या आठवड्यात संग्राम जरी घराबाहेर पडलाअसेल तरीही आणखी एक सदस्य घराबाहेर जाणार आहे. या आठवड्यात नेमका कोणता सदस्य घराबाहेर पडणार याकडे सर्व प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

Raj Thackeray Vision Worli: काळीपिवळी टॅक्सी बघितली की हे शहर म्हणजे ‘मुंबई’ हे कळायचं, पण आता…काय म्हणाले Raj Thackeray?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version