Bigg Boss Marathi Season 5: सूरज चव्हाणची कमाई ऐकून उंचावल्या सर्वांच्या भुवया…

सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या सूरज चव्हाणवर सगळ्यांच्या नजरा खिळल्या आहेत. सूरजने घरातील सदस्यांसोबत बोलताना त्याच्या कमाईबाबत आणि झालेल्या फसवणुकीबाबत सांगितल्यावर घरातील सदस्यांच्या भुवया उंचावल्या.

Bigg Boss Marathi Season 5: सूरज चव्हाणची कमाई ऐकून उंचावल्या सर्वांच्या भुवया…

नुकताच बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनला जोरदार सुरुवात झाली आहे. बिग बॉसच्या घरात प्रवेश केल्यानंतर सगळ्याच १६ स्पर्धकांनी एकमेकांशी ओळख वाढवण्यासाठी संवाद साधण्यास सुरुवात झाली. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी, रिऍलिटी शो गाजवणाऱ्या कलाकारांपासून ते रील स्टार्सही बिग बॉसच्या घरात आहेत. सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या सूरज चव्हाणवर सगळ्यांच्या नजरा खिळल्या आहेत. सूरजने घरातील सदस्यांसोबत बोलताना त्याच्या कमाईबाबत आणि झालेल्या फसवणुकीबाबत सांगितल्यावर घरातील सदस्यांच्या भुवया उंचावल्या.

बिग बॉसच्या घरातील सदस्यांना सुरुवातीपासूनच आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. घरात पाणी नसण्यापासून ते  नाश्तादेखील देण्यात आला नव्हता. या दरम्यान त्यांनी एकमेकांशी संवाद साधून ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पॅडी कांबळे, सुरज चव्हाण, योगिता चव्हाण आणि घरातील इतर सदस्य गप्पा मारत बसले होते. त्यावेळी सूरजने त्याच्या आयुष्यातील काही प्रसंग सांगितले. सूरजने सांगितले की, याआधी माझी फसवणूक झाली आहे. त्यामुळे माझ्या घरातील सदस्यांना खूपच काळजी असते असे सूरजने सांगितले.

टिक टॉक या शॉर्ट व्हिडीओ ऍपमुळे सूरजला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. त्याचा चाहता वर्ग बराच मोठा होता. एखाद्या कार्यक्रमासाठी किंवा उद्घाटन करण्यासाठी ८० हजार मिळायचे असे सूरजने सांगितले. त्यावेळी माझी लोकांनी फसवणूक केली असल्याचे सूरजने सांगितले. आताही मला एका दिवसाचे ३० ते ५० हजार मिळत असल्याचे सूरजने सांगितल्यावर सूरजच्या मानधनाचा आकडा ऐकताच इतरांच्या भुवया उंचावल्या. टिक टॉकच्या पहिल्या दहात स्थान मिळवणारा स्टार अर्थात सूरज चव्हाणने बिग बॉसच्या घरात गेल्याने अनेकांना धक्का बसला. पण असे असले तरी सूरज चव्हाणचा मोठा चाहतावर्ग आहे. इंस्टाग्रामवर त्याचे ९ लाखांहून अधिक चाहता वर्ग आहे. बारामतीमधील या रील स्टार सूरज चव्हाणला आता बिग बॉस मराठीचे घर गाजवण्यासाठी आणि आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी काय प्रयत्न करावे लागतील हे पाहणे आता प्रेक्षकांना रंजक ठरणार आहे.

हे ही वाचा:

Virar मधील धक्कादायक बातमी, Shivsena UBT ठाण्याचे उपशहर प्रमुख Milind More यांचे निधन, हल्लेखोर पसार

Pune Zika Virus : पुण्यात Zika ची चिंता वाढली, दोघांचा मृत्यू तर रुग्णसंख्येत वाढ, काय काळजी घ्यायची?

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version