Bigg Boss OTT Season काही तासांमध्ये येणार प्रेक्षकांच्या भेटीला

सध्या टेलिव्हिजनवरचा रिऍलिटी शो बिग बॉस ओटीटी सिझन २ Bigg Boss OTT Season 2) हा प्रचंड चर्चेत आहे. हा रिऍलिटी शो काही तासांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Bigg Boss OTT Season काही तासांमध्ये येणार प्रेक्षकांच्या भेटीला

सध्या टेलिव्हिजनवरचा रिऍलिटी शो बिग बॉस ओटीटी सिझन २ Bigg Boss OTT Season 2) हा प्रचंड चर्चेत आहे. हा रिऍलिटी शो काही तासांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा शो जिओ सिनेमावर फ्री पाहायला मिळणार आहे. मागील वर्षी हा शो बॉलीवूड निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर याने होस्ट केला होता. जिओ सिनेमाने रिऍलिटी शो बिग बॉस ओटीटी सिझन २ ची घोषणा केल्यापासून हा शो हेडलाइन बनत आहे. शोच्या भव्य प्रक्षेपणासाठी फक्त काही तासच शिल्लक असताना, निर्मात्यांनी या वर्षी वेगळ्या थीमसह तयार केलेल्या असाधारण घराचे अनावरण करून अपेक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

बिग बॉस ओटीटी सिझन २ चे घर प्रवेशद्वार आणि शयनकक्षापासून भव्य जेवणाच्या क्षेत्रापर्यंत, प्रत्येक कोपऱ्याचा उद्देश टिकाऊपणासह कलात्मक घटक टिकवून ठेवण्याचे आहे. प्लॅस्टिकच्या बाटल्यांना बिग बॉसच्या भव्य प्रवेशद्वारामध्ये नवीन जीवन मिळाले आहे. दिवे आणि झुंबर यांसारख्या इतर सजावटीने बिग बॉसचे घर आणखी आकर्षक दिसत आहे. चमचे, स्पॅटुला आणि कडची यांसारखी स्वयंपाकघरातील भांडी आकर्षक कलाकृतींमध्ये बदलली जात आहे.

जिओ सिनेमावर बिग बॉस ओटीटी सिझन २ च्या घराची झलक व्हिडीओच्या मार्फत दाखवण्यात आली आहार. त्याचबरोबर स्पर्धकांच्या टोपण नावानुसार त्याची झलक दाखवण्यात आली आहे. स्पर्धकांच्या टोपण नावानुसार स्पर्धकांना वोट करण्याचे विनंती स्पर्धक करत आहेत. यामध्ये अनेक सोशल मीडियावरचे मोठे चेहरे या बिग बॉस ओटीटी सिझन २ मध्ये सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर अनेक मोठे कलाकार सुद्धा या सीझनमध्ये पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे या शो मध्ये कोणते नवे ट्विस्ट येतील ते पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

हे ही वाचा : 

बिपरजॉय चक्रीवादळाचा लांबपल्याच्या गाड्यांवर मोठा परिणाम, पश्चिमी रेल्वेकडून नवीन अपडेट जारी

साखर कारखान्यासाठी असलेली २५ किलोमीटरची अट समितीद्वारे होणार शिथील, मुख्यमंत्री

International Yoga Day 2023: जाणून घ्या योगाचे प्रकार फक्त एका क्लिकवर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version