Saturday, July 6, 2024

Latest Posts

Bigg Boss OTT Season 3: होस्ट करणार नाही सलमान खान Salman Khan!

घराघरात आवडीने बघितला जाणारा रिऍलिटी शो (Reality Show) म्हणजे बिग बॉस (Bigg Boss). गेली अनेक वर्षे हा शो प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.

घराघरात आवडीने बघितला जाणारा रिऍलिटी शो (Reality Show) म्हणजे बिग बॉस (Bigg Boss). गेली अनेक वर्षे हा शो प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. आणि त्यात सर्वात जास्त पसंत केली जाणारी गोष्ट म्हणजे सलमान खानचे (Salman Khan) होस्टिंग. अनेक वर्ष टीव्हीवर प्रेक्षकांनी या शोला पसंती दिल्यानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT Platform) देखील बिग बॉस प्रदर्शित व्हायला सुरवात झाली. ज्याला ही प्रेक्षकांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. ओटीटी प्लॅटफॉर्म वर २ सीजन (Season 2) झाल्यानंतर आता लवकरच तिसरा सीजन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. परंतु यावेळी सलमान खान हा होस्टच्या स्वरूपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार नाही.

मागची अनेक सीजन सलमान खानच्या होस्टिंगमुळे चर्चेत राहिली आहेत. सलमान खान आणि बिग बॉसला त्याच्या होस्टिंगमुळे एक वेगळी पसंती दिली जाते. टेलिव्हीजनमध्ये होस्टिंगनंतर सलमानने ओटीटी प्लॅटफॉर्म वरील प्रदर्शित होणारा शो देखील होस्ट केला होता. परंतु या सीजन मध्ये सलमान खान होस्टिंग करताना दिसणार नाही. यावर्षी बिग बॉस मध्ये अनिल कपूर (Anil Kapoor) होस्ट करताना दिसून येणार आहे. यामुळे चाहत्यांना एक आश्चर्याचा धक्का बसला आहे.

माध्यमांशी बोलताना जेव्हा अनिलला विचारलं गेलं कि, तुम्ही सलमानला रिप्लेस करत आहेत.तर यावर प्रतिक्रिया देत अनिल कपूर म्हणाले, ‘सलमानला कोणीही रिप्लेस करू शकत नाही,आणि अनिल कपूरला देखील कोणीही रिप्लेस करू शकत नाही.’ लवकरच बिग बॉस ओटीटी सीजन ३ प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून २१ जून पासून जिओ सिनेमावर (JioCinema) तो प्रदर्शित होणार आहे. २४ तास हा शो लाईव्ह असून यावेळी अनेक नव्या गोष्टी घडणार आहेत ज्या अजून गुलदस्त्यात आहेत. स्पर्धार्थींची नावे अजूनही गुलदस्त्यात ठेवली गेली असून लवकरच त्यांची नावे समजणार आहेत. 

हे ही वाचा

 

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss