नव्या वर्षात नाटक-सिनेमाच्या तिकिटात होणार वाढ,मनोरंजन पडणार महाग

नवीन वर्ष सुरु झालं आहे,अशातच अनेक गोष्टींवरचा कर वाढवला जात आहे.यामुळे आपल्या दैनंदिन व्यवहारावर देखील परिणाम होतो

नव्या वर्षात नाटक-सिनेमाच्या तिकिटात होणार वाढ,मनोरंजन पडणार महाग

नवीन वर्ष सुरु झालं आहे,अशातच अनेक गोष्टींवरचा कर वाढवला जात आहे.यामुळे आपल्या दैनंदिन व्यवहारावर देखील परिणाम होतो.अशातच मुंबईकर हा नेहमीच्या धक्काधक्कीच्या आयुष्याला कंटाळलेला असतो,यावेळी थोडा विरंगुळा मिळण्यासाठी आपण कुटुंबासोबत किंवा प्रियजनांनसोबत आपला थोडासा वेळ घालवण्यासाठी सिनेमा किंवा नाटक पाहण्यासाठी बाहेर जात असतो.अशातच चित्रपट आणि नाटकांचा  मोठा चाहतावर्ग आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर विविध विषयांवर भाष्य करणाऱ्या वेगवेगळ्या धाटणीच्या वेबसीरिज रिलीज होत असल्या तरी सिनेमागृहात जाऊन सिनेमा पाहण्याची आणि नाट्यगृहात जाऊन नाटकाचा प्रयोग पाहायची मजा काही औरच आहे. पण आता मुंबईकरांसाठी मनोरंजन महाग होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

मुंबईत नित्यनियमाने नाटक आणि सिनेमा पाहणारा मोठा प्रेक्षकवर्ग आहे. पण नव्या वर्षात नाटक-सिनेमा पाहणं मुंबईकरांसाठी महाग होण्याची शक्यता आहे. गेल्या 13 वर्षांपासून मुंबई महापालिकेने रंगभूमी करात वाढ केलेली नाही. पण आता 13 वर्षानंतर पालिका या करात वाढ करण्याचा विचार करीत आहे.आणि वाढलेला कर जर मोठ असला तर तो मुंबईकरांच्या खिशाला परवडणारा नसला तर यांचा परिणाम चित्रपटसृष्टीवर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

2024-25 या आर्थिक वर्षासाठी कर वाढविण्याचा प्रस्ताव महापालिकेने केला आहे. तसेच हा प्रस्ताव अंतिम मंजूरीसाठी आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार वातानुकूलित चित्रपटगृहांतील प्रत्येक प्रयोगाला 60 वरुन 200 रुपये, तर विनावातानुकूलित चित्रपटगृहांसाठी प्रत्येक शोचे कर हे 45 वरुन 90 रुपये होणार आहेत. नाटकांच्या प्रत्येक प्रयोगावरील 25 रुपये कर 100 रुपये होण्याची शक्यता आहे. गेल्या 10 ते 12 वर्षांपासून सिंगल स्क्रीनच्या तुलनेत अद्ययावत मल्टिप्लेक्स चित्रपटगृहांची संख्या वाढली आहे. त्यामुळे आता 13 वर्षानंतर पालिका या करात वाढ करण्याचा विचार करत आहे.

‘राष्ट्रीय चित्रपट दिनी’ हेमंत ढोमेने प्रेक्षकांसाठी मनोरंजन महाग होतंय का? असं म्हणत एक खास पोस्ट लिहिली होती. त्यावेळी 75 रुपयांत सिनेमे दाखवण्यात आले होते. त्यावेळी सिनेप्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर हेमंत ढोमे म्हणाला होता,”आज राष्ट्रीय सिनेमा दिनाच्या निमित्ताने चित्रपटगृहांनी 75 रु. असा सवलतीचा तिकीट दर लावल्या नंतर प्रेक्षकांनी तुडुंब गर्दी केलीय! सगळीकडे मराठी चित्रपट हाऊसफुल्ल! म्हणजे तिकीट दर कमी असतील तर प्रेक्षक गर्दी करू शकतात?”. मनोरंजन क्षेत्रातील महागाईचा रसिक प्रेक्षकांना मोठा फटका बसणार आहे,त्यामुळे यावर्षात मुंबईकरांसाठी मनोरंजन हे महाग होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:

वनरक्षकांच्या भरतीचा मार्ग मोकळा, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

मराठमोळा अभिनेता किरण माने करणार ठाकरे गटात प्रवेश,हाती बांधणार शिवबंधन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version