बॉबी देओलचा ‘कंगुवा’ चित्रपटातील लूक आउट,वाढदिवशी प्रेक्षकांसाठी खास भेट

बॉलीवूड अभिनेता बॉबी देओलने अँनिमल चित्रपटातून केलेला कमबॅक प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला.बॉबी देओलने साकारलेली खलनायकाच्या भूमिकेला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला.

बॉबी देओलचा ‘कंगुवा’ चित्रपटातील लूक आउट,वाढदिवशी प्रेक्षकांसाठी खास भेट

बॉलीवूड अभिनेता बॉबी देओलने अँनिमल चित्रपटातून केलेला कमबॅक प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला.बॉबी देओलने साकारलेली खलनायकाच्या भूमिकेला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला.आता बॉबी देओलचे  नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.तर आज बॉबी देओलचा वाढदिवसाच्या निमित्ताने कंगुवा या चित्रपटातील पोस्टर शेअर करत चाहत्यांना गिफ्ट दिले आहे. कंगुवा या सिनेमातही बॉबी देओल नेगेटिव्ह भूमिका करताना दिसणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून बॉबीच्या या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. अॅक्शन आणि ड्रामा असलेल्या या सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. 

काही दिवसांपूर्वीच या सिनेमातील सूर्याचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. पोस्टर पाहून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबतची उस्तुकत्ता होती. पोस्टर रिलीज होताच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. दरम्यान, आता निर्मात्यांनी सिनेमातील खलनायकाचे पोस्टरही रिलीज केले आहे. या सिनेमात बॉबी देओल खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.बॉबी सिनेमात उधीरन ही भूमिका साकरणार आहे, बॉबी देओलने हे पोस्टर वाढदिवशी शेअर करत चाहत्यांना मोठे गिफ्ट दिले आहे. 

अभिनेता सनी देओलने छोट्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करत सनीने या शुभेच्छा दिल्या. सनीने बॉबीसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोच्या माध्यमातून सनीने छोट्या भावाप्रति आपले प्रेम व्यक्त केले आहे.  या फोटोला सनीने कॅप्शन देखील दिले आहे. “Happy Birthday My Lil #LordBobby” असे कॅप्शन सनीने फोटोला दिले आहे. 

सिवा दिग्दर्शित कंगुवा या चित्रपटात सुरिया, दिशा पटानी, नटराजन सुब्रमण्यम, जगपती बाबू, योगी बाबू, रेडिन किंग्सले, कोवई सरला इत्यादी लोकप्रिय कलाकार झळकणार आहेत.चित्रपटाचे संगीत देवी श्री प्रसाद यांनी दिले आहे आणि निर्मात्यांनी याआधीच चित्रपटातील एक टिझर आणि पोस्टर शेअर केलंय. ज्यात चित्रपटातील सुरियाचा अंगावर काटा आणणारा लूक दिसून येतो.

बॉबी देओल  नितेशच्या आगामी रामायण या सिनेमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉबी रामायण या सिनेमात कुंभकर्णाची भूमिका साकारणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान आता प्रेक्षकांना या सिनेमाची उस्तुकत्ता आहे.

हे ही वाचा:

काही गुन्हे आदेशाशिवाय मागे घेतले जाणार नाहीत, गुन्हे मागे घेण्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले…

‘निव्वळ निवडणुकांसाठीचे हे गाजर’…आरक्षण मिळाल्यानंतर किरण मानेंनी केलेली पोस्ट लक्षवेधी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version