spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

चक्क बॉलिवूड अभिनेत्री Shilpa Shetty च्या घरी चोरी, पोलिसांकडून दोघांना अटक!

अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही तिच्या अनेक आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. शिल्पाचे अनेक सिनेमे लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत.

शिल्पा शेट्टी ही बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर शिल्पाने बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे लाखोंच्या संख्येत चाहते आहेत. शिल्पाने अनेक भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात आपले घर निर्माण केले आहे. परंतु याच प्रसिद्ध अभिनेत्रीच्या राहत्या घरी काही दिवसांपूर्वीच चोरीची घटना घडली होती. या प्रकरणात आता दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

एक आठवड्यापूर्वी अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी चोरी झाली होती. या संदर्भात अभिनेत्रीकडून पोलसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. याच तक्रारीची दखल घेत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. शिल्पाच्या घरातील महागड्या वस्तूंची चोरी झाली होती. आता पोलिसांनी या महागड्या वस्तू जप्त केल्या असल्याचं समोर आलं आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या बंगल्याचे दुरुस्तीचे काम सुरू असल्याने ती परदेशात होती. त्यावेळी चोरांनी संधी साधून चोरी केली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. अर्जुन सुरेश देवेंद्र (२६), अजय उर्फ रमेश आरमोगम देवेंद्र (२२) अशी या दोन आरोपींची नाव आहेत. जवळपास ६० ते ७० सीसीटीव्ही कॅमेरे तपासल्यानंतर या आरोपींची ओळख पोलिसांना पटली. त्यानुसार या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही तिच्या अनेक आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. शिल्पाचे अनेक सिनेमे लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत. शिल्पा शेट्टीचा ‘केडी द डेविल’ (KD The Devil) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. हा सिनेमा गँगस्टारवर आधारित आहे. या सिनेमात ती दाक्षिणात्य सुपरस्टार ध्रुव सरजासोबत (Dhruva Sarja) स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. कन्नड, हिंदी, तेलुगू, तामिळ आणि मल्याळम अशा पाच भाषांमध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे. शिल्पाचा ‘निकम्मा’ हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला. आता अभिनेत्रीच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता आहे.

हे ही वाचा:

Bigg Boss OTT Season काही तासांमध्ये येणार प्रेक्षकांच्या भेटीला

शाळेतल्या मुलांसाठी Adipurush चा स्पेशल शो, तब्ब्ल ६,२०० स्क्रीन्सवर सिनेमा प्रदर्शित!

शाळेतल्या मुलांसाठी Adipurush चा स्पेशल शो, तब्ब्ल ६,२०० स्क्रीन्सवर सिनेमा प्रदर्शित!

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss