spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

बॉलीवूड सिंगर बादशाह गुपचूप करत आहे या अभिनेत्रीला डेट, वर्षभरानंतर झाला खुलासा

बादशहाला त्याच्या पहिल्या पत्नीपासून एक मुलगी देखील आहे. २०१७ मध्ये त्यांची मुलगी जेसी ग्रेस मसिह सिंगचा जन्म झाला.

रॅपर बादशाह आपल्या दमदार आवाजामुळे चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. त्याच्या गाण्यांवर लोक नाचताना दिसतात. बादशाह त्याच्या कामापेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असतो. लग्नानंतर सिंगल असा टॅग लावून फिरणारा बादशाह आता सिंगल राहिलेला नाही. तो एका सुंदर पंजाबी अभिनेत्रीला डेट करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आजकाल बादशाह पंजाबची सुंदर अभिनेत्री ईशा रिखीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

काही दिवसांपूर्वी बादशाह ‘फॅब्युलस लाइव्ह्स ऑफ बॉलीवूड वाईव्स’ या वेब सीरिजमध्ये दिसला होता. यादरम्यान त्याने स्वतः सिंगल असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता बातमी येत आहे की बादशाह एका पंजाबी अभिनेत्रीला डेट करत आहे. असे म्हटले जात आहे की मित्राच्या पार्टीदरम्यान दोघांची भेट झाली होती आणि तेव्हापासून दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघेही जवळपास एक वर्षापासून एकमेकांना डेट करत असल्याचे बोलले जात आहे.

बादशाहला त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसे बोलणे आवडत नाही. असंही बोललं जात आहे की, दोघांनीही आपल्या कुटुंबियांना याबाबत सांगितलं आहे आणि ते त्यांच्या नात्यावर खूश आहेत. बादशाह आधीच विवाहित आहे. मात्र, पत्नीसोबत झालेल्या वादानंतर दोघेही वेगळे झाले आहेत. बादशाहची पत्नी जस्मिन आता वेगळी राहते. २०१९ मध्ये दोघांमध्ये वाद झाल्याच्या बातम्या आल्या होत्या.

बादशहाला त्याच्या पहिल्या पत्नीपासून एक मुलगी देखील आहे. २०१७ मध्ये त्यांची मुलगी जेसी ग्रेस मसिह सिंगचा जन्म झाला. कोरोना महामारीनंतर जस्मिन आपली मुलगी जेसीसोबत लंडनला राहायला गेली.

हे ही वाचा:

Diwali 2022 : अगदी सोप्या पद्धतीत तुम्हला जमतील अशा खास मेहंदी डिझाइन्स

Bigg Boss Marathi 4 : बिग बॉसच्या घरात गटबाजीला सुरुवात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss