हिंदी चित्रपटांत केलं जातंय मराठमोळ्या Siddharth Jadhavचं कौतुक

हिंदी चित्रपटांत केलं जातंय मराठमोळ्या Siddharth Jadhavचं कौतुक

रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) आगामी सर्कस( circus) या चित्रपटात मराठमोळा कलाकार सिद्धार्थ जाधव , बी टाऊनचा स्टार कलाकार रणवीर सिंगसोबत(Ranveer Singh) झळकणार आहे. सर्कस (Circus) चित्रपटाचं प्रमोशन अगदी जोरात सुरू आहे आणि अशातच चला हवा येऊ दयाच्या (Chala Hawa Yeu Dya) सेट वर या चित्रपटाचं प्रमोशन सुरू असताना रणवीरने सिद्धार्थचं भरभरून कौतुक केल्याचा व्हिडिओ आता समोर येत आहे.

मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) हा रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) हिंदी चित्रपटांमध्ये झळकत असतो. सध्या तो रोहित शेट्टीच्या सर्कस (Circus) चित्रपटांत रणवीर सिंग (Ranveer Singh),जॅक्वलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez),पूजा हेगडे( Pooja Hegde ), वरूण शर्मा( varun sharma), संजय मिश्रा (Sanjay Mishra). पुन्हा एकदा एक मल्टीस्टारर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या स्टारकास्ट सोबत सिध्दार्थ जाधव (Siddharth Jadhav) पडद्यावर दिसणार आहे. सिद्धार्थ मराठी इंडस्ट्रीमध्ये चित्रपटांचा ऊर्जा केंद्र मानला जातो. तसेच हिंदी चित्रपटातही (Bollywood) त्याच्या एनर्जीचं (energy) कौतुक केलं जात. अश्या या सिद्धूची ख्याती आता मराठी सोबत हिंदी सृष्टीत पसरली आहे.

हिंदी सिनेसृष्टीतील तारकांसोबत त्याची खास मैत्री झाली आहे. सध्या रणवीर सिंग (ranvir singh) सोबत सिद्धुची मैत्री चर्चेत आहे. त्या दोघांमध्ये घट्ट मैत्री जमली आहे. सर्कस (Circus) चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान चला हवा येऊ द्या च्या सेट वर रणवीर (ranvir Singh)ने सिद्धार्थ जाधवचे भरभरून कौतुक केले.’मी माझ्या चित्रपटांत मराठी कलाकारांना आवर्जून घेतो कारण, ते त्यांचं काम प्रामाणिकपणे करतात . त्यांना कोणत्याच गोष्टीचा अहंकार नसतो ते दिग्दर्शकाचे शांतपणे ऐकतात’. सर्कस (Circus) सिनेमा २३ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. हा भारतीय विनोदी चित्रपट आहे. ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती स्वतः रोहित शेट्टीने (Rohit Shetty) केली आहे . आता पर्यंत या चित्रपटाने ४० कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाची ३०० कोटीहून अधिक कमाई झाली पाहिजे असं दिग्दर्शकाचं म्हण आहे. चित्रपटाचे रिव्ह्युव्ह बघता चित्रपट चालणार नाही अशी शक्यता देखील वर्तवली जातेय

हे ही वाचा : 

Watch Video, चक्क हरणांचा कळप विमानाला घेऊन आकाशात उडाला!

सर्व देवी-देवता हिंसक आहेत, कालिचरण महाराज यांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

Follow Us टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version