Brahmastra : ब्रह्मास्त्र चित्रपट पाहिला नसेल किंव्हा पुन्हा पाहायचा असेल, तर ही संधी सोडू नका

Brahmastra : ब्रह्मास्त्र चित्रपट पाहिला नसेल किंव्हा पुन्हा पाहायचा असेल, तर ही संधी सोडू नका

Brahmastra

रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली. प्रदर्शनानंतर या चित्रपटाने देश-विदेशात अनेक विक्रम नोंदवले. चित्रपटाबाबत एक नवी माहिती समोर आली आहे. हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्म डिज्नी प्लस आणि हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. ४ नोव्हेंबरला ओटीटीवर तो सर्व भाषात प्रदर्शित होणार आहे. अयान मुखर्जी यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट या वर्षी ९ सप्टेंबरला प्रदर्शित झाला होता. रणबीर आणि आलिया प्रथमच चित्रपटात एकत्र दिसले. ४१० कोटींचा हा बिग बजेट चित्रपट.

OTT प्लॅटफॉर्म Disney+ Hotstar वर चित्रपट प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट 9 सप्टेंबर रोजी हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. ज्यांनी थिएटरचा अनुभव चुकवला ते आता त्यांच्या फोन किंवा टॅब्लेटवर घरच्या आरामात ते पाहू शकतात. ज्यांच्याकडे आधीपासून डिस्ने+ हॉटस्टार सदस्यता आहे त्यांना चित्रपट पाहण्यात कोणतीही अडचण येणार नाही. अन्यथा, ते ऑनलाइन पाहण्यासाठी तुम्हाला सदस्यत्वाची आवश्यकता असेल.

 

हेही वाचा : 

One Nation One ITR Form : कॉमन आयटीआर फॉर्म म्हणजे काय? संपूर्ण माहिती घ्या जाणून

ब्रह्मास्त्र चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर मोठा वाद निर्माण झाला होता. नेटकरी या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी सातत्याने सोशल मीडियावर करत होते. मात्र, असे असताना देखील चित्रपटाने चांगली कमाई केली. कंगना राणावतने ब्रह्मास्त्र चित्रपटाचे बाॅक्स ऑफिस कलेक्शन खोटे दाखवत असल्याचा आरोप केला होता.

सोशल मीडियावर सध्या रणबीर कपूरचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. यामध्ये तो ब्रह्मास्त्रच्या प्रमोशनचं नाव ऐकताच भडकलेला पहायला दिसतोय. आलियाने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. रणबीर या व्हिडीओत जे काही म्हणतोय, त्या तथ्य असल्याचं तिचं म्हणणं आहे. रणबीर आणि आलिया हे ब्रह्मास्त्रचं प्रमोशन करून थकले आहेत. पण या व्हिडीओमागचं नेमकं सत्य काय आहे?

ब्रह्मास्त्र हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारवर येत्या ४ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याचसाठी रणबीरने हा व्हिडीओ शूट केला आहे. थिएटरमध्ये प्रदर्शित होण्याआधी रणबीर-आलियाने ब्रह्मास्त्रचं जोरदार प्रमोशन केलं होतं. त्यामुळे आता ओटीटीसाठी काय प्रमोशन करायचं, असा प्रश्न रणबीर विचारतोय.

Exit mobile version