spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ब्रह्मास्त्र रिव्ह्यू : आयान मुखर्जीचा ड्रीम प्रोजेक्ट ‘ब्रह्मास्त्र’ बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल का?

प्रसिद्ध दिग्दर्शक आयान मुखर्जीचा ड्रीम प्रोजेक्ट ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित करण्यात आला आहे. मात्र प्रदर्शित होण्याआधीच या चित्रपटानं अॅडव्हान्स बुकिंगमध्ये विक्रम केला आहे. पहिल्या तीन दिवसांतच चित्रपटानं अॅडव्हान्स बुकिंगमध्ये कोटींची कमाई केलेली पहायला मिळाली. ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या रिलीजच्या काही दिवस आधीच या चित्रपटाचा पहिला रिव्ह्यूही समोर आला आहे.

हेही वाचा : 

एलिझाबेथ यांच्या मृत्यूनंतर अंत्यविधीसाठी ‘ऑपरेशन युनिकॉर्न’चे नियोजन

जेव्हा चित्रपटाच्या रिलीजपूर्वी त्याच्या VFX बद्दल अधिक चर्चा होते.हा चित्रपट बनवायला बरीच वर्षे लागली. ग्राफिक्सवर बरेच काम केले आहे. या चित्रपटाचे ग्राफिक्स हा चित्रपटाचा जीव आहे. रणबीर कपूरचा अभिनय चांगला होता. त्याने यापूर्वी यापेक्षा चांगली कामगिरी केली आहे. आलिया भट्ट या चित्रपटात छान दिसतेय. तिचा अभिनयही अप्रतिम आहे. अमिताभ बच्चन सर्वाधिक प्रभावित करतात. अमिताभची हेअरस्टाईल खूपच मस्त दिसते. नागार्जुन देखील चांगला काम करताना दिसला. मौनी रॉयने खलनायकाचे काम चोख बजावले आहे. अमिताभ आणि रणबीरसमोरही ती खंबीरपणे उभी आहे.चित्रपटाचा पूर्वार्ध चांगला आहे पण दुसरा हाफ ताणलेला दिसतो.

चित्रपट भव्य आहे, यात शंका नाही पण चित्रपट आपल्याला पूर्णपणे बांधून ठेवत नाही. चित्रपटात काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे आणि यासाठी अयान मुखर्जीचे कौतुक केले पाहिजे कारण आपण अनेकदा म्हणतो की बॉलीवूडचे लोक काहीतरी नवीन का करत नाहीत.पण त्याच्या ग्राफिक्समुळे, मुलांना हा चित्रपट खूप आवडू शकतो आणि VFX प्रेमींना तो आवडू शकतो. एकंदरीत, जर तुम्हाला काही उत्कृष्ट व्हिज्युअल आणि व्हीएफएक्स पहायचे असतील आणि रणबीर आलिया आणि अमिताभचा चाहता असेल तर तुम्ही ब्रह्मास्त्र पाहू शकता.

शिंदे-फडणवीस सरकार म्हणजे इव्हेंट आणि ईडीचं सरकार; सुप्रिया सुळे

भारतातील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटावर खूप मेहनत घेतली गेली असली तरी, बराच काळ पैसा पाण्यासारखा वाहून गेला आहे. अशा परिस्थितीत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल का?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Latest Posts

Don't Miss