spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘विक्रम वेधा’ चे BTS व्हिडिओ व्हायरल, आता चित्रपट करणार नवा रेकॉर्ड!

निर्मात्यांनी दोन नव्या BTS व्हिडिओंसह विक्रम वेधाच्या सेटवरील पडद्यामागील गंमत प्रेक्षकांसोबत शेअर केली आहे.

विक्रम वेधा चित्रपटाची घोषणा होताच, प्रेक्षकांमध्ये एक आनंदाची लहर पसरली होती. तसेच चित्रपटाच्या टीझरला देखील प्रेक्षकांकडून खूप प्रेम आणि प्रशंसा मिळाली होती आणि हा आतापर्यंतचा सर्वाधिक आवडलेला हिंदी चित्रपट टीझर ठरला होता. तसेच विक्रम वेधाच्या टीमने देशातील मुख्य १० शहरांमध्ये आयोजित केलेल्या फॅन टीझर प्रीव्हीव इव्हेंटमुळे प्रेक्षकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतले आहे. अशातच आता सैफ अली खान आणि हृतिक रोशन स्टारर विक्रम वेधाच्या निर्मात्यांनी दोन नव्या BTS व्हिडिओंसह विक्रम वेधाच्या सेटवरील पडद्यामागील गंमत प्रेक्षकांसोबत शेअर केली आहे.

पहिल्या व्हिडिओमध्ये सैफ अली खानला विक्रमच्या रूपात मोठ्या पडद्यावर त्याचे पात्र जिवंत करण्यासाठी केलेल्या सर्व ऍक्शन, टीमवर्क आणि मजा यांची झलक पाहायला मिळते. विक्रमच्या भूमिकेत सैफ पुष्कर आणि गायत्रीच्या दिग्दर्शनाखाली पिस्तूल हातात घेऊन वेधाच्या शोध घेता असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसून आले आहे. तर वेधा ही भूमिका सावरण्याच्या प्रक्रियेत बुडालेल्या हृतिक रोशनचा प्रवास एक वेगळा व्हिडिओ हायलाइट करतो. त्याच्या लूकवर काम करण्याच्या BTS शॉट्सपासून या व्हिडिओची सुरुवात होते. तसेच या व्हिडिओत वेधाच्या विविध छटा आणि याआधी कधीही न पाहिलेल्या अवतारात हृतिक दिसून आलाय. विक्रम वेधच्या सेटवरील नव्याने रिलीज झालेला कंटेंट पीस चित्रपटाच्या निर्मिती दरम्यान निर्माते तसेच कलाकार घेत असलेल्या मेहनतीचे अगदी योग्य ते चित्रण करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

विक्रम वेधा रचणार नवा इतिहास…

येत्या ३० सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘विक्रम वेध’ जगभरातील १०० हून अधिक देशांमध्ये रिलीज होणार आहे. यासह, हा बॉलिवूड (Bollywood)चित्रपटासाठी सर्वात मोठा ओपनिंग ठरणार असल्याचे बोलले जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार ‘विक्रम वेधा’ जगभरातील काही कन्वेशन्ल और नॉन-कन्वेशन्ल मार्केट्समध्ये एक्स्ट्राऑर्डिनरी माइलस्टोन गाठण्यासाठी सज्ज आहे. यामध्ये उत्तर अमेरिका, यूके, मध्य पूर्व, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या प्रमुख देशांच्या सोबतच हा चित्रपट युरोपमधील २२ देशांमध्ये, आफ्रिकेतील २७ देश आणि जपान, रशिया, इस्रायल यांसारख्या देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तसेच हा चित्रपट पनामा पेरू सारख्या लॅटिन अमेरिकन देशांमध्ये सुद्धा प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. विक्रम वेधाची थेट टक्कर छियां विक्रमच्या पीएस वन या बिग बजेट चित्रपटाशी होणार आहे. ज्यांचे बजेट ५०० कोटींच्या आसपास सांगितले जात आहे.

विक्रम वेधा हा एक अॅक्शन-थ्रिलर चित्रपट आहे

‘विक्रम वेध’ हा एक अॅक्शन-थ्रिलर आहे. विक्रम वेधाची कथा ट्विस्ट आणि टर्नने भरलेली आहे, कारण एक कठोर पोलीस विक्रम (सैफ अली खान) धोकादायक गुंड वेधा (हृतिक रोशन) चा माग काढण्यासाठी आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी निघतो. कोणत्या प्रकारचे अडथळे येतात आणखी बरंच काही चाहत्यांना अनुभवायला मिळणार आहे.

हे ही वाचा:

आशिष शेलारांनी केला शिवसेनेवर गंभीर आरोप

अखेर भारतात ‘चित्ता’ परतला, नरेंद्र मोदींच्या हस्ते चित्ते अभयारण्यात सोडले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss