बीटीएस उचलणार बंदुकी, देशासाठी लढायला बीटीएसची तयारी

बीटीएस  उचलणार बंदुकी, देशासाठी लढायला  बीटीएसची तयारी

जगप्रसिद्ध बँड बीटीएस आता संगीत सृष्टीकडून युद्धभूमीकडे वळणार आहेत.

संपूर्ण जगभरात क्वचितच असा कोणी संगीतप्रेमी असेल, ज्याला ‘बीटीएस’ हे नाव माहीत नसेल. दक्षिण कोरियन बँड ‘बीटीएस’ जगभरात प्रसिद्ध आहे त्याचे चाहतेही जगभरात विखुरलेले आहेत. या बँडचे प्रत्येक गाणे चाहत्यांना खूप आवडते आणि त्यांची गाणी अगदी सहज टॉप ट्रेंडमध्ये स्थान मिळवतात. मात्र, आता एक अशी बातमी समोर आली आहे ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसू शकतो . बीटीएस बँडचे हे सगळे कलाकार हातात गिटार ऐवजी बंदूक घेणार आहेत. अर्थात, आपण आपल्या देशाचे काहीतरी देणे लागतो हाच भाव मनात ठेवून हे सगळे कलाकार आता सैन्यात भरती होणार आहेत.

बीटीएस या हिट बँडचे सर्व सदस्य सैन्यात सामील होणार असल्याची अधिकृत माहिती त्यांच्या कंपनीकडून जाहीर करण्यात आली आहे. या निवेदनात, संगीत कंपनीने सांगितले की, बीटीएसचे कलाकार ऑक्टोबर महिन्याच्या शेवटापासून सैन्यात सामील होणार आहेत.

दक्षिण कोरिया या देशाच्या कायद्यानुसार दक्षिण कोरियातील प्रत्येक पुरुषाला वयाची 30 वर्ष पूर्ण होण्याआधी लष्करी सेवा पूर्ण करावी लागते. मिळालेल्या माहिती नुसार , देशाप्रती असेलेले हे कर्तव्य पार पाडण्यासाठी बीटीएसचा कलाकार जिन सगळ्यात आधी सैन्यात भरती होणार असून, त्याची भरती प्रक्रिया पूर्ण होत आली आहे.

बीटीएस हा जगातील सर्वात मोठा संगीत बँड असून या बँडमध्ये सात कलाकारांची टीम आहे आणि प्रत्येक कलाकाराचा एक वेगळा चाहतावर्ग आहे. आता
बीटीएस कलाकार लष्करी कर्तव्यावर जाणार असून, हा बँड काही वर्षांसाठी ब्रेकवर जाणार आहे.मिळालेल्या माहितीनुसार बीटीएस टीम लष्करी सेवा पूर्ण केल्यानंतर २०२५ मध्ये पुन्हा एकदा एक बँड म्हणून परत येईल. या बँडचा सदस्य जिन सगळ्यात आधी सैन्यात भरती होणार असून, त्या आधी ऑक्टोबरमध्ये त्याचा सोलो अल्बम रिलीज होणार आहे. त्याचे काम पूर्ण झाल्यावर तो लगेच लष्करी सेवेसाठी रवाना होईल. त्यानंतर उर्वरित सदस्यही आपापल्या हातातील कामे पूर्ण करून भरती प्रक्रियेला सुरुवात करतील.

हे ही वाचा:

SL vs UAE: श्रीलंकेने T२० विश्वचषक २०२२ च्या सहाव्या सामन्यात UAE चा ७९ धावांनी पराभव केला

आलिया भट ‘या’ हॉस्पिटलमध्ये देणार तिच्या बाळाला जन्म, जाणूनघ्या पूर्ण माहिती

Sonam Kapoor : अभिनेत्री सोनम कपूरचा व्हिडीओ होतोय व्हायरल; करवा चौथची तयारीआणि …

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version