सुनील शेट्टीच्या ‘File No 323’ आगामी चित्रपटावर व्यायसायिक मेहुल चोक्सीनी केला मान हानीचा दावा

सुनील शेट्टीच्या ‘File No 323’ आगामी चित्रपटावर व्यायसायिक मेहुल चोक्सीनी केला मान हानीचा दावा

कार्तिक के दिग्दर्शित फाईल नंबर ३२३ हा चित्रपट आर्थिक फसवणूक करून फरार झालेल्या विजय मल्ल्या आणि निरव मोदी सारख्या उद्योगपतींच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे . या चित्रपटात सुनील शेट्टीचे हे मुख्य भूमिकेत असून त्यांच्यासोबत अनुराग कश्यप सुद्धा असणार आहेत. चित्रपटाच्या निर्मात्यांना आर्थिक फसवणूक करून फरार झालेल्या मेहुल चोक्सी यांनी फाईल नंबर ३२३ मध्ये बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल कायदेशीर नोटीस पाठवली होती.पण आता अभिनेता सुनील शेट्टी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे की निर्मात्यांनी सगळी माहिती सार्वजनिक डोमेनमधून मिळवली आहे .

फाईल नंबर ३२३ चित्रपटातील मुख्य अभिनेते सुनील शेट्टी यांनी चित्रपटाबद्दल सांगितले आहे की फाईल नंबर ३२३ चे निर्मात्यांनी ‘सार्वजनिक डोमेनमध्ये जे काही उपलब्ध होते त्याच्या आधारावर हा चित्रपट बनवण्याचे ठरवले. त्यादरम्यान निर्मात्यांना उद्योगपती मेहुलकडून त्याची बदनामी केल्याबद्दल कायदेशीर नोटीस पाठवली होती” तसेच सुनील शेट्टी यांनी सांगितलं की हा चित्रपट बोल्ड असून अनुराग कश्यप यात विजय मल्ल्याच्या भूमिकेत दिसणार आहे’. तसेच सुनील शेट्टी हे एक मोठ्या चार्टर्ड अकाऊंटंट फर्मच्या ऑडिटरची भूमिका बजावत आहे, सुनील शेट्टी ज्या पात्राची भूमिका साकारत आहेत या पात्राकडे आर्थिक गोष्टींबद्दल बऱ्यापैकी अधिक माहिती आहे. शूटिंगला सुरुवात झाली होती यादरम्यान मेहुल चोक्सीकडून नोटीस आली आहे आणि ती कुठून आली हे सुनील शेट्टी यांना माहित नव्हते.सुनील शेट्टी यांनी पुढे सांगितलं की “चित्रपटातील दिग्दर्शक आणि निर्माते यांनी पब्लिक डोमेनमध्ये जे काही उपलब्ध झाले त्याच्या आधारावर चित्रपट बनवत आहेत म्हणून मेहुल यांची बदनामी होणे हा प्रश्न उपस्थित होतच नाही”.

या विषयी पुढे बोलताना सुनील यांनी सांगितलं कि , “ फरार झालेल्या लोकांना अशा प्रकारची कर्जे दिली तेव्हा बँका, संस्था आणि चेअरमन काय विचार करत होते? आणि त्यावेळी सरकार काय करत होते. यावर आधारित हा चित्रपट आहे. हा एक धाडसी विषय आहे.”असे सुनील शेट्टी यांनी संगील.

अर्ध्यातासासाठी येऊन विकासाच्या गप्पा सांगणं आम्हाला पटत नाही ; संदिपान भुमरेंचा सुषमा अंधारेंवर हल्लाबोल

अर्ध्यातासासाठी येऊन विकासाच्या गप्पा सांगणं आम्हाला पटत नाही ; संदिपान भुमरेंचा सुषमा अंधारेंवर हल्लाबोल

Exit mobile version