२१५ कोटींच्या खंडणीप्रकरणी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसवर आरोपपत्र दाखल

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) हिच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आयकर विभागाने २१५ कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी जॅकलिनला आरोपी बनवले आहे.

२१५ कोटींच्या खंडणीप्रकरणी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसवर आरोपपत्र दाखल

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) हिच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आयकर विभागाने २१५ कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी जॅकलिनला आरोपी बनवले आहे. ईडीकडून आज जॅकलिनविरोधात आरोपपत्र दाखल केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचं नाव २०० कोटींच्या मनी लँड्रिंग प्रकरणात चांगलीच चर्चेत आहे. सुकेश चंद्रशेखर प्रकरणात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला माहिती होती की, सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) खंडणी वसुल करणार आहे. त्यानंतर आता अंमलबजावणी संचालनालयाने (ED – Enforcement Directorate) अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसवर आरोपपत्र दाखल केले आहे. ईडीने २१५ कोटींच्या खंडणी प्रकरणात जॅकलिन फर्नांडिस आरोपी असल्याचं म्हंटले आहे.

जॅकलिन फर्नांडिसचे सुकेश चंद्रशेखरसोबतचे अनेक कनेक्शन समोर आले आहेत. त्यामुळे ती कायदेशीर अडचणीत सापडली आहे. ईडीने यापूर्वीही २१५ कोटी रुपयांचा खंडणीचा आरोप केला होता. त्यानंतर आज ईडी तिच्याविरोधात आरोपपत्र दाखल करणार आहे. आयकर विभागानं दिलेल्या माहितीनुसार, जॅकलिन फर्नांडिसला ठग सुकेश चंद्रशेखरनं ५.७१ कोटी रुपयांच्या महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. एवढंच नाही तर त्यानं तिच्या कुटुंबीयांनाही महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. हा सर्व पैसा सुकेशनं लोकांची फसवणूक करून आणि गुन्हेगारीतून कमावला होता. दिल्लीमध्ये तुरुंगात असताना त्यानं एका महिलेचे २०० कोटी रुपये फसवणूक करुन लांबवले होते. आयकर विभागनं दिलेल्या माहितीप्रमाणे जॅकलिनच्या विरोधातील ही प्राथमिक कारवाई आहे. या प्रकरणात तिच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

सुकेशने जॅकलिनला ५२ लाख रुपये किंमतीचा घोडा भेट म्हणून दिला होता. तर ९ लाख रुपयांची पर्शियन मांजर गिफ्ट दिली होती. जॅकलिनसोबतच या आरोपपत्रात अभिनेत्री नोरा फतेहीचाही उल्लेख केला आहे. सुकेशने नोराला खूप महागडी कार भेट म्हणून दिली होती. या मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने यापूर्वीच दोन्ही अभिनेत्रींची चौकशी करण्यात आली होती.

सुकेश चंद्रशेखर हा बंगळुरुतला एक उद्योगपती आहे. सुरुवातीला नोकरी देण्याच्या आमिषाने त्याने अनेकांची फसवणूक केली. ७५ जणांचे १०० कोटी रुपये घेऊन त्याने पोबारा केला. निवडणूक आयोगात ओळख असल्याचं सांगून हवं ते चिन्ह मिळवून देण्याचं आमिष त्यानं दाखवलं. याच प्रकरणात दिल्ली पोलिसांनी त्याला २०१७ मध्ये अटक केली.

हे ही वाचा :-

इनस्टाग्रामवर अमोल कोल्हेच्या नावे डुप्लीकेट अकाऊंट तयार करत, पैसे उकडण्याचा प्रकार

विधानसभा पावसाळी अधिवेशन २०२२; आमदार रोहित पवार आणि आमदार प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया

Exit mobile version