spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Charu- Rajeev Sen यांचा झाला घटस्फोट, फोटो शेअर करत लिहिले…

राजीव सेन (Rajeev Sen) आणि चारू असोपा (Charu Asopa) यांच्या वैवाहिक जीवनात अनेक दिवांपासून दुरावा निर्माण झाला होता.

राजीव सेन (Rajeev Sen) आणि चारू असोपा (Charu Asopa) यांच्या वैवाहिक जीवनात अनेक दिवांपासून दुरावा निर्माण झाला होता. गेल्या वर्षी या जोडप्याने कायदेशीर विभक्त होण्यासाठी अर्ज दाखल केला होता. तर आज दिनांक ८ जुने रोजी राजीव आणि चारू यांचा अधिकृतपणे घटस्फोट झाला आहे. आजच त्यांच्या घटस्फोटाबाबत न्यायालयात अंतिम सुनावणी झाली आणि त्यासोबतच न्यायालयाने त्यांचा घटस्फोट मंजूर केला आहे.

लग्नाला चार वर्षे पूर्ण होण्याच्या एक आठवड्यापूर्वीच दोघांचा घटस्फोट झाला आहे. चारू आणि राजीव यांचे १६ जून २०१९ रोजी गोव्यात भव्य लग्न झाले होते. लग्नच्या एका वर्षांतच त्यांच्या वैवाहिक जीवनात अनेक अडचणी आल्या. यामुळे त्याने लग्नाचा पहिला वाढदिवसही साजरा केला नाही. चारू आणि राजीव यांनी त्यांच्या लग्नाला अनेक संधी दिल्या असल्या तरी या दरम्यान त्यांच्या घरात एक मुलगीही जन्माला आली. मात्र त्यानंतर त्यांच्या वैवाहिक जीवनात तणाव निर्माण झाला. दोघांनी एकमेकांवर अनेक आरोप केले. चारूने राजीववर घरगुती हिंसाचाराचा आरोपही केला होता. यानंतर दोघांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा कायदेशीर मार्ग स्वीकारला. आज राजीव आणि चारू शेवटी एकमेकांपासून वेगळे झाले आहेत आणि आता ते त्यांची मुलगी जियाना सहपालक आहेत.

अखेर आज या दोघांचंही घटस्फोट हा झाला आहे. घटस्फोटानंतर सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेनने इन्स्टाग्राम स्टोरीवर चारूसोबतचा एक फोटो शेअर केला आहेयावेळी तो म्हणाला आहे की, “कोणताही निरोप नाही. फक्त दोन लोक जे एकमेकांना धरू शकले नाहीत. प्रेम कायम राहील. आम्ही आमच्या मुलीचे नेहमीच आई आणि वडील राहू.”

हे ही वाचा:

देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांनंतर एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट

राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण, राहुल नार्वेकर म्हणाले…

Biporjoy वादळाचा वाढता धोका! पुढील २४ तासांत दिसू शकते रौद्र रूप

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss