spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘छत्रपती संभाजी’ चित्रपटात रजित कपूर साकारणार औरंगजेबची भूमिका

सध्या मराठी सिनेसृष्टीत विविध धाटणीचे मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.दरम्यान ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांना चांगलेच भावतात.

सध्या मराठी सिनेसृष्टीत विविध धाटणीचे मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.दरम्यान ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांना चांगलेच भावतात.अशातच  ‘छत्रपती संभाजी’  हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.याआधि आपण या चित्रपटातले कलाकारांचे वेगवेगळे पोस्टर पाहिले.अशातच गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटात कोणकोण भूमिका साकारणार हे नवनव्या पोस्टरच्या माध्यमातून पाहतच आहोत.

‘ब्योमकेश बक्षी’ या मालिकेमुळे घराघरात पोहचलेले अभिनेते रजित कपूर औरंगजेबाच्या भूमिकेत दिसणार आहेत. राकेश सुबेसिंह दुलगज निर्मित आणि दिग्दर्शित ‘छत्रपती संभाजी’ या मराठी चित्रपटात ते क्रूरकर्मा औरंगजेबाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट येत्या २ फेब्रुवारी २०२४ रोजी आपल्या भेटीला येणार आहे.परफेक्ट प्लस एंटरटेनमेंट’ आणि ‘एजे मीडिया कॉर्प’ प्रस्तुत ‘छत्रपती संभाजी’ हा चित्रपट मराठी, हिंदी, तमिळ, तेलगू आणि इंग्रजी मध्ये एकाच वेळी प्रदर्शित होत आहे.औरंगजेब क्रूर शासक होता, सोबत तो धोरणी आणि  कपटी  होता. त्यामुळे औरंगजेबसाठी कसलेला कलाकार हवा होता, रजित कपूर या भूमिकेला न्याय देऊ  शकतील  यामुळे  त्यांना  ही संधी  दिल्याचं दिग्दर्शक राकेश सुबेसिंह  दुलगज सांगतात.

आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना रजित कपूर ते सांगतात की, मी आतापर्यंत खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका केल्या. ‘छत्रपती संभाजी’ च्या निमित्ताने मला प्रथमच नकारात्मक ऐतिहासिक भूमिका करण्याची संधी मिळाली.  या चित्रपटाचा मी महत्त्वपूर्ण भाग आहे याचा मला आनंद आहे. रजित कपूर यांच्यासह प्रमोद पवार, शशांक उदापूरकर,दिलीप ताहिल, मृणाल कुलकर्णी, मोहन जोशी, भरत दाभोळकर, लोकेश गुप्ते, बाळ  धुरी, दिपक शिर्के,अमित देशमुख , कै. आनंद अभ्यंकर,समीर, मोहिनी पोतदार, प्रिया गमरे आदी कलाकार  ‘छत्रपती संभाजी’  चित्रपटात आहेत.

‘छत्रपती संभाजी’ चित्रपटाची सहनिर्मिती एफआयएफ निर्मिती संस्थेची आहे. कथा  सुरेश चिखले यांची आहे. अविनाश विश्वजित, गुरु शर्मा आणि आरव यांचे संगीत चित्रपटाला लाभले असून पार्श्वसंगीत अमर-अमित देसाई यांनी  दिले आहे.  छायांकन सुरेश देशमाने तर संकलन भरत भाई यांचे आहे. कला अनिल वठ यांची आहे. साहसदृश्ये पी. सतीश यांची आहेत.

हे ही वाचा:

१ फेब्रुवारी २०२४ च्या अर्थसंकल्पात नेमक्या कोणत्या घोषणा होणार, निर्मला सीतारामन यांनी दिले संकेत

बॉबी देओलचा ‘कंगुवा’ चित्रपटातील लूक आउट,वाढदिवशी प्रेक्षकांसाठी खास भेट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss