चतुर चोर सिनेमा लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

या सिनेमाच्या निम्मताने तुझ्यात जीव रंगलामधील ( Tuzyat Jeev Rangala हार्दिक आणि अक्षयची लाडकी जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार

चतुर चोर सिनेमा लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

चतुर चोर सिनेमा

सिनेमातील कॉमेडी (Comedy)  आणि हॉरर (Horro) हे दोन असे जॉनर आहेत ज्यांची जागा कुणीच घेऊ शकत नाही. ह्या दोन्ही प्रकाच्या सिनेमांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. आणि त्यामुळे जर हॉरर आणि कॉमेडी जॉनरचा एखादा सिनेमा आला तर दोन्हीकढील प्रेक्षक वर्ग हा सिनेमा मोठ्या आवडीने पाहतात आणि सिनेमाला योग्य तो न्याय देतात. लवकरच एक नवा कोरा हॉरर कॉमेडी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकतेच या सिनेमाचे चित्रीकरण लंडन (London) येथे झाले आहे. हा एक वेगळी आणि तंगडी स्टारकास्ट घेऊन येत आहे. ज्यात अभिनेता हार्दिक जोशी (Hardik Joshi), अभिनेत्री प्रीतम कागणे (Pritam Kagane), अक्षया देवधर (Akshaya Deodhar) हे कलाकार झळकणार आहेत.

या सिनेमाच्या निम्मताने तुझ्यात जीव रंगलामधील ( Tuzyat Jeev Rangala हार्दिक आणि अक्षयची लाडकी जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे अक्षया, हार्दिक आणि प्रीतम यांनी या सिनेमात नक्की कसे काम आहे, हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे. या सिनेमाच्या निर्मितीची धुरा किरण कुमावत, स्वाती खोपकर, सुरेखा कागणे, हर्षवर्धन गायकवाड, अमोल कागणे आणि सागर पाठक यांनी पेलवली असून सहनिर्माते म्हणून तबरेज पटेल आणि निनाद भट्टीन यांनी बाजू सांभाळली आहे. तर दिग्दर्शक आणि छायाचित्रकार अमोल गोळे यांनी या संपूर्ण चित्रपटाचे दिग्दर्शन आणि छायाचित्रण केले आहे. या चित्रपटाची कथा सुमित संघमित्रा आणि सागर पाठक यांनी लिहिली आहे. आता या चित्रपटाची कथा नेमकी काय असेल, हार्दिक, प्रीतम, अक्षयासोबत इतर कोणते कलाकार या सिनेमात झळकणार, हे पाहणं औत्स्युक्याचं ठरणार आहे.

लंडनमध्ये चित्रित झालेल्या या हॉरर कॉमेडी ‘चतुर चोर’ ( Chatur Chor) मधला चतुर चोर नेमका कोण असेल, याची उत्सुकता आता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.

हे ही वाचा:

‘भाग्य दिले तू मला’ मालिकेत रंगणार ‘मंगळागौर’

Exit mobile version