छत्रीवालीचा ट्रेलर झाला रिलीज, एका नव्या ढंगात रकुल प्रीत सिंग येणार प्रेक्षकांच्या भेटीला

गेल्या काही दिवसांपासून रकुल तिच्या आगामी 'छत्रीवाली' या चित्रपटासाठी चर्चेत आहे. आता अखेर या चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज झाला आहे.

छत्रीवालीचा ट्रेलर झाला रिलीज, एका नव्या ढंगात रकुल प्रीत सिंग येणार प्रेक्षकांच्या भेटीला

रकुल प्रीत सिंगने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवल्यापासून ती अनेक गंभीर समस्या प्रेक्षकांसमोर मांडताना दिसत आहे. अशा परिस्थितीत तिच्या प्रत्येक चित्रपटासाठी जगभरातील लोक उत्सुक होऊ लागले आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून रकुल तिच्या आगामी ‘छत्रीवाली’ या चित्रपटासाठी चर्चेत आहे. आता अखेर या चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज झाला आहे. यामध्ये रकुल सेक्स एज्युकेशनसारख्या मुद्द्यांवर खुलेपणाने बोलताना दिसत आहे.

यात शंका नाही की आजही भारतातील अनेक भागांमध्ये लोक लैंगिक शिक्षणाबद्दल बोलण्यास टाळाटाळ करतात. शालेय पुस्तकांमध्ये यासंबंधीचे प्रकरण असले तरी या मुलांना खुलेआम शिक्षण दिले जात नाही. हा विषय उपस्थित करत रकुल आता सर्वांना जीवनातील एक महत्त्वाचा धडा शिकवण्यासाठी निघाली आहे. सेक्स एज्युकेशनबद्दल शिकवताना शाळेतील शिक्षक मुलांच्या प्रश्नांची उत्तरे देताना अस्वस्थ होत असल्याचेही ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे.

ट्रेलरमध्ये एक शिक्षक वर्गात मुलांना शिकवत आहे. दरम्यान, एका मुलाने त्याला विचारले, ”कॉप्यूलेशन म्हणजे काय?’ संकोचतेने शिक्षक उत्तरात म्हणतात की एक पक्षी दुसऱ्या पक्ष्यावर बसतो. त्यानंतरच दुसऱ्या सीनमध्ये रकुलची एन्ट्री होते, जी सर्व काही सरळ सांगते. यानंतर, पुढच्या सीनमध्ये दाखवण्यात आले आहे की जेव्हा तिचा प्रियकर जवळ येतो तेव्हा त्याला कंडोम वापरायचे नसते. त्याचवेळी ३ गर्भपाटांमुळे तिच्या वाहिनीची प्रकृती बिघडलेली असते. दुसरीकडे, तिच्या कुटुंबातील मुलीला लैंगिक शिक्षणाचा अभ्यास करताना फक्त स्त्रियांशी संबंधित गोष्टी जाणून घ्यायच्या असतात.

छत्रीवाली या चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस प्रभा विजय देवस्कर यांनी केले आहे. रकुलने यात सान्या धिंग्राची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात सुमित व्यास, सतीश कौशिक, डॉली अहलुवालिया, राजेश तैलंग, प्राची शाह पंड्या, राकेश बेदी आणि रिवा अरोरा यांच्या भूमिका आहेत. चित्रपटाबाबत महत्त्वाची बाब म्हणजे ‘छत्रीवाली’ चित्रपट थिएटरमध्ये नाही तर ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहे. तुम्ही येत्या २० जानेवारी हा चित्रपट ZEE5 वर पाहू शकाल.

हे ही वाचा:

सलमान खानच्या एक्स प्रियसीने केला मोठा खुलासा, ‘याबद्दल मला अजूनही भयानक स्वप्ने पडतात’

सोशल मीडियावर शाहरुख खानला चाहत्याने विचारलेल्या प्रश्नावर, मुंबई पोलिसांनी दिले ‘हे’ उत्तर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version