Thursday, July 4, 2024

Latest Posts

बालकलाकार मायरा वायकुळ होतेय प्रचंड ट्रोल, डोक्यात जाणारी मुलगी…म्हणत नेटकऱ्यांनी साधला निशाणा

झी मराठीवरच्या ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतील परी तुम्हाला आठवते का? छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध बालकलाकार म्हणून मायरा वायकुळने आपली ओळख निर्माण केली आहे.

झी मराठीवरच्या ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतील परी तुम्हाला आठवते का? छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध बालकलाकार म्हणून मायरा वायकुळने आपली ओळख निर्माण केली आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत मायराने साकारलेल्या परी ची भुमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. आणि मायराने देखील परी या भुमिकेला चांगलाचं न्याय दिला. या भुमिकेमुळे मायराने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यांनतर मायराने ‘नीरजा- एक नई पहचान’ या हिंदी मालिकेत देखील काम केले आहे. त्याच बरोबर मायर सोशलमिडियावर देखील चांगलीच ऍक्टिव्ह असते.

मायर ही सोशल मिडियावर चांगलीच ऍक्टिव्ह असल्याचे दिसत आहे. प्रत्येक सणाला किंवा ट्रेण्डिंग विषय धरून, स्वतःचे फोटो किंवा रील्स ती नियमित करत असते. तिच्या या फोटो आणि व्हीडिओंना नेटकरी पसंती देताना दिसत असतात. परंतु सध्या नेटकऱ्यांनी तिला चांगलेच ट्रोल केले आहे. डोक्यात जाणारी मुलगी, असं म्हणत नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.

सध्या पुष्पा 2 या सिनेमातील ‘सोसेटी’ हे गाणं प्रचंड ट्रेंड होतंय. या गाण्यावर कलाकारापासून सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि नेटकऱ्यांनी भरपूर रील्स केले आहेतं. याच ‘सोसेटी’ गाण्यावर मायरा वायकुळ हिनेही रील केलं आहे. नुकतंच पावसाळा सुरु झालाय. पहिल्या पावसाचा आनंद घेत मायरा ‘सोसेटी’ या गाण्यावर रील केलं. तिचं हे रील चर्चेत आहे. अनेकांनी तिच्या या रीलला पसंती दिलीय. मायरा कुठे गेली आहे गावी गेलीस का? खूप छान झालंय रील, अशा कमेंट चाहत्यांनी म्हटलं आहे. पण नेटकऱ्यांनी मात्र तिला प्रचंड ट्रोल केलं आहे. डोक्यात जाणारी मुलगी, असं एका नेटकऱ्याने केली आहे. वयापेक्षा मोठी झालेली मुलं किशोरवयात प्रेशरमध्ये असल्याचं फिल करतात, असं दुसऱ्याने म्हटलं आहे. वयापेक्षा मोठी होत आहे. अभ्यासाकडे लक्ष दे… अश्या रील्स करण्यात टाईमपास करून काही होणार नाही. ही तर नखरे करण्यात पटाईत आहे, असंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. तर काही नेटकऱ्यांनी मायराच्या पालकांनाही सुनावलं आहे. Shamelss parents! या मुलीला अश्लील गाण्यांवर नाचायला लावतात. काय वय आणि काय धिंगाणा… लहान पोरीच्या कमाईवर खाणारे पालक… लाज वाटू द्या जरा थोडी तरी…, अशी कंमेट नेटकऱ्याने केली आहे.

हे ही वाचा : 

MNS Raj Thackeray यांचं Naresh Mhaske साठी सूचक वक्तव्य, दिल्लीत गेलात म्हणजे…

‘गरज सरो आणि वैद्य मरो’ ; नवनिर्वाचित खासदार थेट शिवतीर्थावर रवाना

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

 

Latest Posts

Don't Miss