Chup Free Screening : दिग्दर्शक आर बाल्की यांनी ‘चुप’ चित्रपटाच्या मोफत स्क्रिनिंगबद्दल दिली मोठी माहिती

Chup Free Screening : दिग्दर्शक आर बाल्की यांनी ‘चुप’ चित्रपटाच्या मोफत स्क्रिनिंगबद्दल दिली मोठी माहिती

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज चित्रपट निर्मात्यांपैकी एक, आर बाल्की यांचा पुढील चित्रपट चुप – द रिव्हेंज ऑफ आर्टिस्ट आहे. या चित्रपटात बॉलिवूड सुपरस्टार सनी देओल आणि अभिनेता दुल्कर सलमान महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. मंगळवारी देशातील १० मोठ्या शहरांमध्ये ‘चुप’ चित्रपटाचे मोफत प्रदर्शन प्रेक्षकांसाठी ठेवण्यात आले आहे. रिलीजपूर्वी दिग्दर्शक आर बाल्की यांनी या स्पेशल स्क्रिनिंगबद्दल मोठी गोष्ट सांगितली आहे.

हेही वाचा : 

SSC-HSE Exams : विद्यार्थ्यांनो तयारीला लागा, दहावी-बारावीच्या परीक्षा ‘या’ तारखेला सुरु होणार

चूपच्या मोफत स्क्रीनिंगवर आर बाल्की यांचे मोठे विधान

चूप हा हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिलाच चित्रपट ठरला आहे, जो प्रदर्शित होण्यापूर्वी चित्रपट समीक्षकांऐवजी थेट प्रेक्षकांना दाखवला जात आहे. चूपच्या या स्पेशल स्क्रिनिंगबाबत आर बाल्की म्हणाले की- ‘जेव्हाही आम्ही चित्रपट बनवतो तेव्हा हा चित्रपट प्रेक्षकांना कसा आवडेल याचा विचार करतो. हाच विचार करून मी यावेळी प्रथम थेट प्रेक्षकांना चित्रपट दाखवण्याचा निर्णय घेतला आहे, त्यानंतर हा चित्रपट समीक्षकांना दाखवला जाईल. जर आपण लोकांसाठी चित्रपट बनवले तर त्याचे महत्त्व प्रथम येते. मला हे नेहमीच करायचे होते. आम्ही सर्व पाहुण्यांना चित्रपटाच्या पहिल्या स्क्रीनिंगसाठी आमंत्रित करतो, मग प्रेक्षकांना का नाही.’२३ सप्टेंबर रोजी सनी देओल आणि दुल्कर सलमान स्टारर चुप सिनेमागृहात प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे.

Grampanchayat Election Result : सर्वाधिक ग्रामपंचायतींवर कमळ, तर शिंदे गट व राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच सुरू

Exit mobile version