मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिम्मित प्रसाद ओक सह ‘या’ कलाकारांनी दिल्या शुभेच्छा!

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा आज ५९ वा वाढदिवस आहे. एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिम्मित अनेक ठिकाणी अनेक कार्यक्रमांचे आयोजन हे करण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिम्मित प्रसाद ओक सह ‘या’ कलाकारांनी दिल्या शुभेच्छा!

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा आज ५९ वा वाढदिवस आहे. एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिम्मित अनेक ठिकाणी अनेक कार्यक्रमांचे आयोजन हे करण्यात आले आहे. काळ रात्री पासून एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी कार्यकर्त्यांची मोठी प्रमाणात गर्दी ही दिसून येत आहे. तसेच एकनाथ शिंदे याना सोशल मीडिया मार्फत देखील अनेक शुभेच्छा या दिल्या जात आहेत. अनेक कार्यकर्त्यांसह प्रत्येक स्तरांवरील व्यक्तींनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्या दिल्या आहेत. तसेच कलाकार मंडळींनी देखील त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. प्रसाद ओक (Prasad Oak), मंगेश देसाई (Mangesh Desai) आणि क्षितीज दाते (Kshitij Date) यांनी सोशल मीडियावर म्हणजेच इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे आणि त्यामध्ये त्यांना अनेक शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

 अभिनेता प्रसाद ओक याने म्हंटल आहे की,
मा. मुख्यमंत्री
श्री. एकनाथ जी शिंदे साहेब
वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा…!!!
ईश्वर आपल्याला निरोगी आणि उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना…!!!

त्याच बरोबर मंगेश देसाई यांनी सुद्धा मोठी पोस्ट लिहीत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामध्ये ते म्हणाले आहेत,
साहेब तुमच्या विषयी काय लिहू ??!!!
किती लिहू !!!शब्द अपुरे आहेत पण भावना खूप आहेत आणि त्या शब्दात व्यक्त करता येणं शक्यच नाहीत .पण आज एक प्रसंग आठवतो ,
2009 साली तुमच्या वाढदिवसाला मी शुभेच्छा चा फोन केला होता आणि एक भावना व्यक्त केली होती “तुम्ही मुख्यामंत्री व्हावं “तुम्ही हसला होतात ‘आणि हे कसं शक्य आहे मंगेश ?असं म्हणाला होतात .पण माझ्या सारख्या अनेक लोकांनी हीच भावना देवा जवळ मनापासून बोलून दाखवली असणार आणि देवाने ती साठवून ठेवली असणार .तुम्ही मुख्यामंत्री झालात ,जनतेचे आवडते झाला आहात .मुख्यमंत्रि झाल्यानंतर चा हा वाढदिवस .या पुढील प्रयेक वाढदिवस तुमच्या आयुष्यात नवनवीन शक्ती देणारा ठरो हीच देवाकडे प्रार्थना .तब्येतीची काळजी घ्या .कामा बरोबर आराम पण करा आणि शक्तिशाली व्हा.

हे ही वाचा : 

संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल, व्हिडिओ शेअर करत केली पोलखोल

जितेंद्र आव्हाडांच्या वक्त्यव्यांवर संभाजी छत्रपती संतापले, चर्चेत राहण्यासाठी बेताल वक्तव्य…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Exit mobile version