कॉफी विथ करण शो मध्ये कार्तिकने सारा बद्दल जे सांगितले त्यामुळे सारा नाराज

अलीकडेच करण जोहरच्या कॉफी विथ करण शो मध्ये कार्तिक ने भुल भुलय्या २ च्या प्रमोशन वेळी हजेरी लावली होती. त्यात त्याने अशा काही गोष्टी सांगितल्या की सारा अली खान अस्वस्थ झाली.

कॉफी विथ करण शो मध्ये कार्तिकने सारा बद्दल जे सांगितले त्यामुळे सारा नाराज

कॉफी विथ करण शो मध्ये कार्तिकने सारा बद्दल जे सांगितले त्यामुळे सारा नाराज

मुंबई : लव्ह आज कल २ च्या शूटिंग दरम्यान सारा अली खान आणि कार्तिक आर्यन हे एकमेकांना डेट करत होते. पण पुढे त्यांचं ब्रेकअप झालं आणि दोघांनी आपापल्या आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला. मागच्या एका पुरस्कार सोहळ्यात हे दोघे एकत्र दिसल्यापासून आता पुन्हा त्यांच्या प्रेमाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. Sara Ali Khan upset with Kartik Aryan’ s statement
अलीकडेच करण जोहरच्या कॉफी विथ करण शो मध्ये कार्तिक ने भुल भुलय्या २ च्या प्रमोशन वेळी हजेरी लावली होती. त्यात त्याने अशा काही गोष्टी सांगितल्या की सारा अली खान अस्वस्थ झाली. जेव्हा कार्तिक ला विचारण्यात आलं की, लव्ह आज कल २ च्या दरम्यान सारासोबतच्या त्याच्या प्रेमाच्या चर्चा हा चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग होता का? यावर आर्यन म्हणाला की, चित्रपटातील प्रत्येक गोष्ट प्रमोशनसाठी नसते. आपण माणसं आहोत आणि प्रत्येक गोष्टीचा खोटा प्रचार केला जात नाही. सारा ला ही वैयक्तिक गोष्ट उघडपणे सांगितल्याने पटलेले नाही अशी माहिती समोर येतेय. तर एकीकडे आर्यनच्या उत्तराचं मात्र सर्वत्र कौतुक झालं.
कॉफी विथ करणच्या नवीन सीझनबद्दल बोलताना करण एका मुलाखतीत म्हणाला, माझ्या शोच्या सोफ्यात काहीतरी खास गोष्ट आहे. ज्यामुळे इथे अनेक जोड्या बनल्या आहेत. कतरीना – विक्कीपासून आलिया – रणबीर ची उदाहरणं देत आता करणने आर्यनसोबतच्या डेटिंगचं गुपित उघड केल्याने सारा नाराज असल्याचं वृत्त आहे.
अलीकडेच करण जोहरचा प्रसिद्ध शो ‘कॉफी विथ करण’च्या सातव्या सीझन ला सुरूवात झाली. शोच्या पहिल्याच भागात आलियाने भट्ट (Alia Bhatt) ने तिचा आवडता को स्टार रणवीर सिंगसोबत (Ranveer Singh) शो मध्ये हजेरी लावली होती. शो मध्ये आलिया आणि रणवीर च्या वैयक्तिक जीवनाबद्दल चर्चा करण्यात आली. यावेळी आलिया ने अनेक खुलासे केले. आलिया ने सैफ अली खान चा मुलगा इब्राहिम अली खान बद्दलचा एक मजेदार किस्सा शेअर केला. या व्यतिरिक्त करण ने तिला अनेक प्रश्न विचारले.
Exit mobile version