कॉमेडियन भारती सिंह आणि पती हर्ष अडचणीत? ड्रग्ज प्रकरणी NCB कडून न्यायालयात आरोपपत्र दाखल

कॉमेडियन भारती सिंह आणि पती हर्ष अडचणीत? ड्रग्ज प्रकरणी NCB कडून  न्यायालयात आरोपपत्र दाखल

अभिनेता सुशांत सिहंन राजपूतच्या मृत्यूनंतर मनोरंजन उद्योगात काम करणाऱ्या अनेक मोठ्या कलाकारांची नाव ड्रग प्रकरणात समोर आली होती. त्यामध्ये कॉमेडियन भारती सिंह (Bharti Singh) आणि तिचा पती हर्ष लिम्बाचिया (Haarsh Limbachiyaa) यांचाही सहभाग होता. ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी (Drug Case) कॉमेडियन भारती सिंह आणि पती हर्ष अडचणीत येण्याची शक्यता आहे. एनसीबीनं (NCB) या दोघांविरुद्ध न्यायालयात तब्बल २०० पानांचं आरोपपत्र दाखल केलं असून लवकरच या दोघांविरुद्ध न्यायालयात खटला सुरू होणार आहे, दरम्यान, ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी २०२० मध्ये दोघांनाही एनसीबीनं अटक केली होती. सध्या दोघंही जामीनावर बाहेर आहेत.

दरम्यान, १४ जून २०२२ रोजी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं आपल्या राहत्या फ्लॅटमध्ये फाशी घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर बॉलिवूडमध्ये खळबळ माजली होती. अनेक आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी जडल्या. तसेच, बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेटही समोर आलं होतं. याचप्रकरणात अभिनेत्री रिझा चक्रवर्ती आणि तिच्या भावालही एनसीबीकडून अटक करण्यात आली होती. याव्यतिरिक्त सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांसारख्या प्रसिद्ध अभिनेत्रींचीही चौकशी करण्यात आली होती. याप्रकरणी अनेक सेलिब्रिटी चौकशीच्या फेऱ्यात अडकले होते. याच प्रकरणात भारती सिंह आणि तिचा पती हर्ष यांची नावंही समोर आली होती. एनसीबीनं दोघांच्या ऑफिस आणि घरावर छापेमारी केली होती. त्यावेळी त्यांच्या घरातून ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. याचप्रकरणी आता एनसीबीनं आरोपपत्र दाखल केलं आहे.

एनसीबीकडून ड्रग्ज केस प्रकरणात एका ड्रग विक्रेत्याला (drug peddler) अटक अटक करण्यात आली होती , त्याची चौकशी झाल्य्यावर भरती सिह आणि तिचे पती हर्ष यांच्या घरावर आणि ऑफिस वर १ नोव्हेंबर २०२० रोजी छापा टाकण्यातआला होता. या छाप्यात एनसीबीला त्यांच्या दोघांच्या घरात ८६.५ ग्रॅम गांजा सापडला , हा गांजा जप्त करण्यात आला आणि लगेचच त्यानंतर या जोडप्याला अटक करण्यात आली. त्यानंतर दोघांनाही न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आलं, त्यावेळी न्यायालयानं त्यांना ४ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र, या जोडप्याला २३ नोव्हेंबर रोजी अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयानं प्रत्येकी १५ हजार रुपयांची जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला .त्यानंतर एनसीबीकडून सत्र न्यायालयासमोर याचिका दाखल करून, फिर्यादीचं म्हणणं न ऐकता जामीन मंजूर केल्याचा दावा करण्यात आला होता .

हे ही वाचा :

गुन्हेगार पोलिसांवर भारी, रात्री उशिरा अंधारात का थांबले? विचारणा केल्यास पोलिसांनाच मारहाण

व्हाईट पिंपलने त्रस्त आहात का ? तर नक्की वाचा

मुंबईतील टॅक्सी चालक संघटना सीटबेल्ट नियमांच्या विरोधात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version