Manoj Muntashir यांचे वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले ‘बजरंगबली हे देव नव्हते…’

माहितीनुसार, ६०० कोटींच्या बजेटमध्ये आदिपुरुष या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. ओम राऊतनं आदिपुरुष या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

Manoj Muntashir यांचे वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले ‘बजरंगबली हे देव नव्हते…’

१६ जून रोजी आदिपुरुष (Adipurusha) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि तेव्हा पासूनच हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. आदिपुरुष हा चित्रपट ओम राऊत (Om Raut) यांनी दिग्दर्शित केला आहे तर अभिनेता प्रभास (Prabhas) आणि अभिनेत्री क्रिती सनोन (Kriti Sanon) हे या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. आदिपुरुष प्रदर्शित झाल्यानंतर या सिनेमावर अनेकांनी टीकांचा वर्षाव केला आणि त्यामुळे आता सोशल मीडियावर वातावरण चांगलेच तापले आहे. सोशल मीडियावर अनेक नेटकऱ्यांमध्ये नाराजी आहे. चित्रपट पाहून आलेल्या प्रेक्षकांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. आदिपुरुष हा चित्रपट कोणत्याच पातळीवरून प्रेक्षकांना पसंत पडलेला नाही हे दिसून आलेले आहे. यातच आता सिनेमाच्या लेखकांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

आदिपुरुष चित्रपटाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर (Manoj Muntashir) यांना देखील आदिपुरुष चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून ट्रोल केलं जात होत. सध्या मनोज मुंतशीर यांच्या एका वक्तव्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. एका मुलाखतीमध्ये मनोज मुंतशीर यांनी सांगितलं की, “बजरंगबली हे देव नव्हते, तर ते भक्त होते.” मनोज मुंतशीर यांच्या मुलाखतीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की मनोज मुंतशी हे चित्रपटात वापरण्यात आलेल्या डायलॉग्सबद्दल सांगितलं, “चित्रपटात सोपी भाषा वापरण्याचा उद्देष हा होता की, बजरंगबली यांना आपण विद्येचा देवता मानतो. बजरंगबली यांच्याकडे पर्वतासारखं बळ आहे, पण तेच बजरंगबली हे एका बालकासारखे देखील आहे. बजरंगबली हे प्रभू श्रीराम यांच्यासारखं बोलत नाहीत” पुढे मनोज मुंतशीर यांनी सांगितलं, “बजरंगबली हे देव नाहीयेत. ते भक्त आहेत. आपण त्यांना देव केलं कारण त्यांच्या भक्तीमध्ये तेवढी शक्ती होती.”

माहितीनुसार, ६०० कोटींच्या बजेटमध्ये आदिपुरुष या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. ओम राऊतनं आदिपुरुष या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. आदिपुरुष हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. अभिनेता प्रभासनं या चित्रपटात प्रभू श्रीरामची भूमिका साकारली आहे तर अभिनेत्री क्रिती सेनोनने आदिपुरुष या चित्रपटात सीता ही भूमिका साकारली आहे.

हे ही वाचा:

कारल्याची भाजी खाल्यावर हे पदार्थ मुळीच खाऊ नका! आरोग्यावर होईल मोठा दुष्परिणाम…

गद्दार दिन यावर शिंदे गटाच्या बड्या नेत्यांनी दिली प्रतिक्रिया, हळू हळू बंडाचे खरे स्वरुप…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version