Dharmaveer 2 सिनेमावर वाद, सुषमा अंधारेंच्या पोस्टवर प्रवीण तरडेंचं रोखठोक भाष्य, म्हणाले…

चित्रपटात दाखवण्यात आलेल्या बंडावरून आणि बाकी घटकांवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना चांगलंच सुनावलं आहे.

Dharmaveer 2 सिनेमावर वाद, सुषमा अंधारेंच्या पोस्टवर प्रवीण तरडेंचं रोखठोक भाष्य, म्हणाले…

‘जो हिंदू हित की बात करेगा, वही देशपर राज करेगा’ अशी थेट आणि स्पष्ट गर्जना करणारे धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे पदर “धर्मवीर – २” या चित्रपटातून उलगडले आहे. दिनांक २७ सप्टेंबरला “धर्मवीर – २” हा चित्रपट प्रदर्शित झाला. या सिनेमाची जोरदार चर्चा आहे. एकीकडे अपेक्षेप्रमाणे शिवसेना शिंदे गटाकडून या चित्रपटाचे स्क्रिनींग अनेक ठिकाणी मोफत करण्यात आले. तर, शिंदेंच्या शिवसैनिकांनी चित्रपटावर चर्चाही सुरू केली आहे. मात्र, ऐन विधानसभा निवडणुकांच्या (Election) तोंडावर हा चित्रपट प्रदर्शित करत शिंदेंच्या शिवसेनेकडून राजकीय नेरेटीव्ह पसरवला जात असल्याचा आरोप केला जातोय. तर दुसरीकडे मात्र या चित्रपटावरून अनेक वाद हे सुरु झाले आहेत.

धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित धर्मवीर चित्रपटाचा उत्तरार्ध आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील यामध्ये दिसून येत आहे. एकनाथ शिंदे यांनी या चित्रपटामध्ये स्वतःची भूमिका सादर केली आहे, यामुळे प्रेक्षकांना मोठा धक्का बसला आहे. या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या बंडावरून आणि बाकी घटकांवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना चांगलंच सुनावलं आहे. त्यांनी याबाबत आपल्या सोशल मिडियावर पोस्ट लिहून प्रवीण तरडेंवर हल्लाबोल केला होता, याबाबत बोलताना आज तरडेंनी उत्तर दिलं आहे.

सुषमा अंधारे यांचं ट्विट – 

‘धर्मवीर’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर ट्विट करत अंधारे म्हणाल्या, ‘शिवसेनेत माझा प्रवेश हा गद्दारी झाल्यानंतर म्हणजे 28जुलै22ला झाला. पण मतांसाठी निवडणुकिसाठी थुकरट युक्ती तरडेनी दाखवली आहे. @mieknathshinde सांगताहेत गद्दारीचा एक कारण सुषमा अंधारे शिवसेनेत आल्या..!! प्रवीण तरडेजी कलेशी बेईमानी म्हणतात ती हीच का?’ असं ट्विट अंधारे यांनी केलं आहे.

नेमकं काय म्हणाले तरडे?

यावर प्रविण तरडे म्हणाले, ‘सुषमा ताईंनी बहुदा सिनेमा पाहिलेला नाही. त्यांनी कुणाकडून तरी ऐकलं असेल, सिनेमा पाहिल्यानंतर जर तो संवाद नीट ऐकला, तर कळेल की त्या संपूर्ण सीनमध्ये कोणाचं नाव घेतलेलं नाही… मला देखील आश्चर्य वाटलं की सुषमा ताई असं म्हणाल्या. पण त्यांचं जे काही काम आहे त्या एका राजकीय पक्षाचं काम करतात. मी अजिबात कुठेही कोणाचं नाव घेतलेलं नाही. सिनेमा पाहा तो सीन काय आहे ते पाहा.. सिनेमा पाहिल्यानंतर कोणाला कोणता प्रश्नच पडणार नाही…’

पुढे तरडे म्हणाले, ‘ज्यांनी सिनेमा पाहिला आहे, त्यांना कोणालाही प्रश्न पडलेला नाही. विरोधकांनी सिनेमा पाहिला तर, विराधकांना देखील सिनेमा आवडेल… कारण ती दिघे साहेबांच्या, बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट आहे.आम्ही सिनेमा बनवला आहे. त्यामुळे सिनेमा पाहिल्यानंतर कोणाला प्रश्न पडणार नाही…’ असं देखील तरडे म्हणले…

Exit mobile version