कॉस्च्युम स्टायलिस्टने गायक राहुल जैनवर केला बलात्काराचा आरोप

गायक-संगीतकार राहुल जैन यांच्याविरुद्ध ३० वर्षीय महिला 'कॉस्च्युम स्टायलिस्ट'वर बलात्कार केल्याप्रकरणी एफआयआर दाखल

बॉलीवूड गायक-संगीतकार राहुल जैन ( Rahul Jain) यांच्याविरुद्ध ३० वर्षीय महिला ‘कॉस्च्युम स्टायलिस्ट’ (Costume Stylist) वर बलात्कार (Rape) केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली आहे. एका अधिकाऱ्याने सोमवारी ही माहिती दिली. तथापि, गायकाने हे आरोप फेटाळले आणि ते “खोटे आणि निराधार” असल्याचे म्हटले आहे.

एफआयआरचा हवाला देत एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, तक्रारदाराने ओशिवरा पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या आपल्या जबाबात म्हटले आहे की, जैन यांनी त्यांच्याशी इन्स्टाग्रामवर संपर्क साधला आणि त्यांच्या कामाचे कौतुक केले आणि मग आरोपीने फिर्यादीला त्याच्या अंधेरी येथील फ्लॅटवर बोलावले.

अधिकाऱ्याने सांगितले की, महिला 11 ऑगस्ट रोजी जैन यांच्या फ्लॅटवर गेली होती. सामान दाखवण्याच्या बहाण्याने आरोपीने तिला आपल्या बेडरूममध्ये नेले आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला स्वतंत्र ‘कॉस्च्युम स्टायलिस्ट’ म्हणून काम करते. महिलेने सांगितले की, तिने विरोध केल्यावर जैन यांनी तिला मारहाण करून पुरावा नष्ट करण्याचा देखील प्रयत्न केला. या सर्व प्रकाणामुळे राहुल जैन यांच्याविरुद्ध पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६, ३२३ आणि ५०६ अंतर्गत एफआयआर नोंदवली आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. पण तरीसुद्धा आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

जैन यांना या प्रकरणाबद्दल विचारले असता ते म्हणाले, मी या महिलेला ओळखत नाही. त्यांनी केलेले आरोप खोटे आणि निराधार आहेत. यापूर्वीही एका महिलेने माझ्यावर असेच आरोप केले होते, पण मला न्याय मिळाला. ही स्त्री त्यांचीच सहकारी असू शकते.

या पूर्वीसुद्धा बॉलीवूडमधील एका गीतकार आणि लेखिकेने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये राहुल जैन यांच्याविरोधात बलात्कार, जबरदस्ती गर्भपात आणि फसवणूक यासह विविध आरोपांवर एफआयआर दाखल केली होती. त्यामुळे बॉलिवूड गायक आणि संगीतकार राहुल जैन यांच्यावरचे हे आरोप सिद्ध होऊन त्यांना अटक होते का कि हे बलात्काराचे आरोप खोटे ठरतात हे पाहणे आता महत्वाचे ठरणार

हे ही वाचा:

चतुर चोर सिनेमा लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Exit mobile version