Daar Ughad Baye शरद पोंक्षे फेम रावसाहेब दिसणार महिलेच्या वेशात, मालिकेला आलं रंजक वळण

सध्या 'झी मराठी' वरील 'दार उघड बये' ही मालिका जोरदार चर्चेत आहे. 'दार उघड बये' (Daar Ughad Baye) ही मालिका आता रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे.

Daar Ughad Baye   शरद पोंक्षे फेम रावसाहेब दिसणार महिलेच्या वेशात, मालिकेला आलं रंजक वळण

Daar Ughad Baye :सध्या ‘झी मराठी’ वरील ‘दार उघड बये’ ही मालिका जोरदार चर्चेत आहे. ‘दार उघड बये’ (Daar Ughad Baye) ही मालिका आता रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. या मालिकेत अभिनेते शरद पोंक्षे प्रमुख भूमिकेत आहेत. येत्या ५ डिसेंबरपासून या मालिकेचा अँक्शन पॅक आठवडा प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. अत्यंत ताठर, कठोर आणि पुरुषी अहंकाराने भरलेल्या रावसाहेब नगरकरांची ते भूमिका साकारत आहेत. महिलांना कमी लेखणाऱ्या या पुरुषाचे आता गर्वहरन होणार आहे. पुरुषी मक्तेदारीला छेद देत घरातील स्त्रियांना सन्मान मिळवून देण्यासाठी मुक्ता झटणार आहे. त्यामुळे आता या मालिकेत प्रेक्षकांना नव-नविन ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत.

आंतरजातीय विवाह केल्याने रावसाहेब आपल्या मुलाला आणि सून मुक्ता हीला घरातून हाकलून देतात. शिवाय त्यांच्यावर नाना पद्धतीने अत्याचार करतात. त्यांच्या या पुरुषी मक्तेदारीला छेद देऊन घरातील स्त्रियांना सन्मान मिळवून देण्यासाठी मुक्ता आता झटणार आहे. मुक्ता सारंगचा गृहप्रवेश झाल्यानंतर रावसाहेब मुक्ताच्या पावलांचा ठसा असलेलं कापड जाळून टाकतात. तसेच कोंडून ठेवलेल्या सारंगच्या आईला म्हणजेच वैजयंतीला ते मुक्ताला भेटू देत नाहीत. दुसरीकडे आर्याचे आई-बाबा नगरकरांच्या घरी येतात. रावसाहेब त्यांना शब्द देतात की, आर्याचं नगरकरांची सून म्हणून या घरात दिसेल आणि तसं झालं तर मी स्वत: रावसाहेब बाईचा वेश घालून हातात बांगड्या भरून दिवसभर घरात फिरेन.

त्यामुळे आता मुक्ता पुरुषी मक्तेदारीला छेद देणार का? तसेच त्यासोबत घरातील स्त्रियांना सन्मान मिळवून देणार का? आव्हानांचा सामना करण्यासाठी तिला सारंगची साथ कशी मिळेल अशा अनेक गोष्टी प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळणार आहेत.

हे ही वाचा : 

सोनम कपूरने केला तिच्या मुलाबद्दल मोठा खुलासा, म्हणाली

HIT 2 ‘हिट २’ मधील अभिनेता आदिवी शेषच्या अभिनयाची सोशल मिडीयावर होतेय स्तुती

अभिनेता आयुष्मान खुरानाच्या ‘अ‍ॅक्शन हिरो’ या चित्रपटाला पहिल्याच दिवशी निराशा

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version