spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आला रे आला गोविंदा आला ! अखेर दोन वर्षांनी मुंबई-उपनगरांसह राज्यातभरात धाकुमाकुम

राज्यात दहीहंडी उत्सव जोमात साजरा करण्यात येत आहे. कोरोनानंतर दोन वर्षांनी त्याच जोशात, उत्साहात गोविंदा अधिकाधिक थर लावण्यासाठी आणि दहीहंडी फोडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे आयोजकांनी सुद्धा मोठी तयारी या उत्सवासाठी केली आहे. अधिकाधिक थर लावणाऱ्या किंवा थरांचा विश्वविक्रम करणाऱ्या गोविंदा पथकांसाठी लाखोंची बक्षीसं आयोजकांनी ठेवली आहेत. त्यामुळे आयोजकांपासून ते गोविंदापथकांपर्यंत सगळ्यांचाच उत्साह शिगेला पोहचला आहे.

जय जवानच पथक नाही तर मुंबई ठाण्यातील २०० हून अधिक गोविंदा पथक सुद्धा यंदा मैदानात उतरले आहेत. कारण दोन वर्षांनंतर जेव्हा अशाप्रकारे थाटामाटात दहीहंडी उत्सव होतो, तेव्हा पूर्वीपेक्षा अधिक थर लावण्यासाठी प्रत्येक गोविंद पथक प्रयत्न करणार आहे. कारण तशा प्रकारची भरघोस बक्षीस सुद्धा आयोजकांनी ठेवल्याने त्याचे विशेष आकर्षण असणार आहे. त्यामुळे आयोजकांची आणि दुसरीकडे गोविंदा पथकाची जवळपास तयारी पूर्ण झाली असून आता दहीहंडी उत्सवाचे वेध लागले आहेत. एकीकडे आयोजकांनी केलेली तयारी तर दुसरीकडे भर पावसात अशा प्रकारचा गोविंदा पथकांचा उत्साह हे सगळे पाहून यंदाचा दहीहंडी उत्सव रंगणार यात काहीच शंका नाही.

दहीहंडीला खेळाचा दर्जा, मुख्यमंत्री शिंदेची मोठी घोषणा

महिला पथकाला दहीहंडी उत्सव साजरा करता यावा यासाठी महानिर्देशक, सीमा सुरक्षा बल, मुख्यालयासह विविध केंद्रीय यंत्रणा तसेच गुजरात राज्यातील सरकारी यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी आवश्यक सहकार्य करणात आहेत. दादर मधील सर्वात जुनी आणि प्रसिद्ध आयडलची दहीहंडी फोडण्याचा मान त्यांनी पटकावला आहे. तर दुसरीकडे डोंबिवलीतील महिलांचे अष्टविनायक महिला मंडळ हे प्रसिद्ध असून गेले २५ वर्षांपासून पाच ते सहा थर लावून महिला गोविंदा हंडी फोडतात. या वर्षी मात्र अष्टविनायक महिला मंडळाची ही थरांची चपळाई नागरिकांना पाहता येणार नाही. दहीहंडीसाठी सराव झाला नसल्याने व कोरोनाचे संकट नुकतेच कमी झाले असल्याने काही कारणास्तव या पथकाने दहीहंडी फोडणार नसल्याचे सांगितले.

हेही वाचा : 

श्रीकृष्ण जन्माष्टमीला रात्री १२ वाजता उघडणार रामजन्मभूमीचे दरवाजे

Latest Posts

Don't Miss