spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

डार्लिंग फेम विजय वर्मा करतोय तमन्ना भाटियाला डेट, व्हायरल फोटो आले समोर

ज्यामध्ये दोघे एकमेकांना किस करताना दिसले आहेत आणि यासह ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे स्पष्ट झाल्याचे मानले जात आहे.

सोशल मीडियावर सेलिब्रिटींच्या डेटिंगच्या चर्चा सतत होत असतात. आता या यादीत आणखी एका जोडप्याच्या नावाची भर पडली आहे. तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांची आहे. अलीकडेच, एका व्हायरल व्हिडिओमध्ये त्यांच्या उपस्थितीबद्दल बोलले जात आहे.ज्यामध्ये दोघे एकमेकांना किस करताना दिसले आहेत आणि यासह ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे स्पष्ट झाल्याचे मानले जात आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारे दोघे प्रत्यक्षात एकमेकांना किस करताना आणि मिठी मारताना दिसत आहेत, परंतु त्यांच्या इन्स्टा पेजवर एका चाहत्याने त्यांचे स्पष्ट व्हिडिओ शेअर केल्यावर लोकांना व्हिडिओमधील ते दोघे तमन्ना आणि विजय आहे याची खात्री झाली.व्हिडिओतील अंधुक कपल दुसरे तिसरे कोणी नसून तमन्ना आणि विजय वर्मा आहे हे चाहत्यांच्या समोर आले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Glamour Alert (@glamouralertofficial)

तसे, हे दोघे पहिल्यांदाच एकत्र दिसले आहेत असे नाही, याआधीही जेव्हा दोघेही दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये एकत्र दिसले होते, तेव्हाही त्यांच्या जवळीकतेची बरीच चर्चा झाली होती आणि त्या दोघांनीही लोकांच्या त्या चर्चा आणि दावे कधीच फेटाळून लावले नाहीत. असं म्हणतात की प्रेम लपून राहत नाही. या प्रकरणातही ही गोष्ट खरी ठरत आहे. दोघांनीही आपलं प्रेम लपवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांच गुपित उघडकीस आलंच.

त्यांनी कोणत्याही चित्रपटात एकत्र काम केले नसल्याने ते एकमेकांच्या इतके जवळ कसे आले हे कोणालाच माहीत नाही. पण अनेकदा त्यांना विमानतळावरही स्पॉट करण्यात आले आहे. मिर्झापूरमध्ये दिसल्यानंतर प्रसिद्ध झालेला विजय वर्मा 2022 मध्ये रिलीज झालेल्या आलिया भट्टच्या डार्लिंग्समध्ये तिच्या पतीची भूमिका साकारताना दिसला होता आणि त्यानंतर तिची लोकप्रियता गगनाला भिडली होती.

हे ही वाचा:

बॉक्स ऑफिसला लागले ‘वेड’! विकेंड सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये समावेश

‘अम्मा तुम्ही माझ्यासाठी खूप काही आहात’ शिझान खानच्या आईसाठीची तुनीषा शर्माची व्हॉइस नोट होतेय व्हायरल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss