दे धक्का 2 लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

दे धक्का या सिनेमाचा सिक्वेल दे धक्का 2 प्रदर्शित होण्याबाबत अनेक चर्चा होत होत्या.

दे धक्का 2 लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

दे धक्का 2 लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

दे धक्का या सिनेमाचा सिक्वेल दे धक्का 2 प्रदर्शित होण्याबाबत अनेक चर्चा होत होत्या. खरं तर जानेवारीत प्रदर्शित होणारा हा सिनेमा कोरोनाच्या महामारीमुळे प्रदर्शित केला गेला नव्हता. पण, महिन्याभरापूर्वी लाँच केलेल्या मुविंग पोस्टरमधून दे धक्का 2 चा झलक प्रेक्षकांना पाहता आली होती. आणि सध्या प्रदर्शित झालेल्या टीझरमधून या सिनेमातील काही प्रत्येक पात्राची ओळख प्रेक्षकांना करून घेता येत आहे.

दे धक्का 2 च्या या टीझरमधून मकरंद अनासपुरेंसह इतर पात्रातील वेगळेपणा आपल्या दिसून येतोय. महेश मांजरेकर आणि सुदेश मांजरेकर दिग्दर्शित ह्या सिनेमाचं शूटिंग लंडनमध्ये करण्यात आलं आहे. या सिनेमात मकरंद अनासपुरेंसह , शिवाजी साटम, मेधा मांजरेकर, सिद्धार्थ जाधव हे देखील प्रमुख भूमिकेत दिसून येत आहेत.

दे धक्का 2 च्या टीझरच्या सुरुवातीला एक पत्रकार मकरंद अनासपुरेंची मुलाखत घेताना दिसतेय. तुम्ही लाँच करत असलेल्या गाडीचे नाव काय? या प्रश्नाचं उत्तर देताना आता इकडं मारुती आहे तर, आपला हनुमान पाहिजे का नाही’ असे अनेक विनोदी डायलॉग आपल्याला या टिझरमध्ये ऐकायला मिळतात.

लाँच झालेल्या टिझरमुळे दे धक्का 2 बाबत प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे आणि हा सिनेमा येत्या 5 ऑगस्टला प्रदर्शित करण्यात येणार आहे.दरम्यान, ‘दे धक्का’ हा चित्रपट २००८ मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट हॉलिवूडमधील २००६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लिटिल मिस सनशाइन’ या चित्रपटावर आधारित होता. या चित्रपटाचा कन्नडमध्ये ‘क्रेझी कुटुंब’ म्हणून रिमेक करण्यात आला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुदेश मांजरेकर आणि अतुल काळे यांनी केलं होतं.

हेही वाचा : 

पी. व्ही. सिंधू सिंगापूर ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल

Exit mobile version