‘दे धक्का २’ चित्रपटाची तारीख झाली जाहीर

नुकेतच या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज डेट सह सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आले. हा पोस्टर अनेक चाहत्यांना आवडला असून या चित्रपटाची कथा कशी असेल हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत.

‘दे धक्का २’ चित्रपटाची तारीख झाली जाहीर
सुदेश मांजरेकर आणि अतुल काळे यांनी दिग्दर्शित केलेला “दे धक्का” सुमारे १४ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता आणि  प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या चित्रपटाला मिळाला होता. दे धक्का चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनामध्ये विशेष स्थान मिळवले होते आणि आता या चित्रपटाचा सिक्वेल महेश मांजरेकर आणि सुदेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केला आहे.
येणाऱ्या ५ ऑगस्ट २०२२ रोजी दे धक्का २ प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती अमेय विनोद खोपकर एंटरटेनेंट  यांच्या स्वाती खोपकर आणि यतीन जाधव यांच्या स्काय लिंक एंटरटेनेंट यांच्या द्वारे केली आहे.
दे धक्का २ मध्ये पहिल्या दे धक्का प्रमाणेच सुरुवात केली आहे. शिवाजी साटम, मकरंद अनासपुरे, मेधा मांजरेकर, सिद्धार्थ जाधव, सक्षम कुलकर्णी आणि सिक्वेलमध्ये संजय खापरे, गौरी इंगवले, प्रवीण विठ्ठल तरडे, विद्याधर जोशी, भारती आचरे असे बरेच कलाकार या चित्रपटात दिसून येणार आहेत.
नुकेतच या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज डेट सह सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आले. हा पोस्टर अनेक चाहत्यांना आवडला असून या चित्रपटाची कथा कशी असेल हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत. महेश मांजरेकर दिग्दर्शित अनेक चित्रपट प्रेक्षकांचे आवडीचे चित्रपट ठरले आहेत. पोस्टर पाहून अनेक चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
Exit mobile version