Rajabhau More नाट्यक्षेत्रासह आध्यात्मिक क्षेत्रात मोठे योगदान असलेले राजाभाऊ मोरे यांचं निधन

Rajabhau More नाट्यक्षेत्रासह आध्यात्मिक क्षेत्रात मोठे योगदान असलेले राजाभाऊ मोरे यांचं निधन

Rajabhau More passes away संपूर्ण आयुष्य रंगभूमीवर लोकांच्या मनोरंजनासाठी अनेक नाटकांमध्ये काम गेलं, पण नाटक पाहताना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे ज्येष्ठ रंगकर्मी राजाभाऊ मोरे (rajabhau more) यांचं निधन झालं आहे. राजाभाऊ मोरे यांचं निधन झाल्यामुळे रंगभूमी कलाकारांना मोठा धक्का बसला आहे. राजाभाऊ मोरे आमरावती (amravati) येथील होते. अनेक नाटकांमध्ये राजाभाऊ मोरे यांनी मोलाचं योगदान दिलं, पण नाटक पाहतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि राजाभाऊ मोरे यांचं निधन झालं.

हेही वाचा : 

मविआच्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी मुंबईत भाजपचं ‘माफी मांगो’ आंदोलन

राज्य नाट्य स्पर्धेत नाटक सुरू असताना राजाभाऊंना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्यांना झेनिथ रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. राजाभाऊंनी आपले संपूर्ण आयुष्य नाट्य क्षेत्रासाठी आणि सामाजिक कार्यात वाहून घेतले होते. राजाभाऊ मोरे यांनी राज्य नाट्य स्पर्धेक अनेक नाटकं सादर केली आहेत. तसेच त्यांच्या नाटकांना राज्यस्तरावर पारितोषिते प्राप्त झाली आहेत. नाट्यक्षेत्रासह आध्यात्मिक क्षेत्रातदेखील राजाभाऊंचे मोठे योगदान आहे. नीलकंटेशवर देवस्थानचे ते विश्वस्त होते. तसेच आझाद हिंद मंडळाच्या सार्वजनिक हनुमान मंदिर आणि हनुमान जन्मोत्सव अनेक वर्षापासून साजरा करण्यात त्यांचा मोठा सहभाग होता.

अभिनेत्री तेजस्विनी पंडितने केला तिच्या आयुष्यातील धक्कादायक खुलासा

राजाभाऊ मोरे यांच्या निधनानंतर मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी ट्वीट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. ते ट्विट करत म्हणाले, ‘राज्य नाट्य स्पर्धा हा त्यांचा श्वास होता. दीर्घकाळ त्यांनी राज्य नाट्य स्पर्धा गाजविली. या निष्ठावान रंगकर्मीच्या निधनाने नाट्यक्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे.’

Avatar The Way of Water २०२२ चा अखेरचा महिना अवतार साठी ठरणार लाभ दायक

Exit mobile version