दीपिका आणि रणवीरने घेतले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरच्या गणपतीचे दर्शन

नुकतच अभिनेता रणवीर सिंह, दीपिका पादुकोण आणि सारा अली खान यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरच्या दर्शन घेतले आहे

दीपिका आणि रणवीरने घेतले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरच्या गणपतीचे दर्शन

आज आहे अनंतचतुर्दशी म्हणजेच बाप्पाला निरोप देण्याचा दिवस. जशी लोकांची गणपतीच्या आगमनाच्यावेळी लगबग सुरु होती आणि तशीच काहीशी घाईगडबड आजही सर्वत्र दिसून येत आहे. आज १० दिवसांचे गणपतींचे विसर्जन केले जाणार आहे. लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, मुंबईचा राजा अशा अनेक मुंबईतील प्रसिद्ध गणपतींचेसुद्धा आज विसर्जन केले जाणार आहे. पण अजूनही अगदी गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशीही अगदी सर्वसामान्य लोकांपासून मोठमोठ्या सेलिब्रेटींपर्यंत सर्वच ठिकठिकाणी जाऊन बाप्पाचं दर्शन घेत आहेत.

नुकतच अभिनेता रणवीर सिंह, दीपिका पादुकोण आणि सारा अली खान यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरच्या दर्शन घेतले आहे.महाराष्ट्रात गणेशोत्सवात घरोघरी बाप्पा विराजमान होतो. या दहा दिवसांत गणरायाची मनोभावे सेवा केली जाते. सर्वसामान्य लोकांपासून ते सेलेब्रेटींपर्यंत सर्वजण मोठ्या उत्सहात हा सण साजरा करतात. सोबतच सेलिब्रेटी ठिकठिकाणी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतात. महारष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरीसुद्धा बाप्पा विराजमान झाला आहे. अनेक क्षेत्रातील दिग्गज याठिकाणी दर्शनासाठी येत आहेत.

यावेळी अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह पारंपरिक अंदाजात दिसून आले. दीपिकाने मोठ्या बनारसी दुपट्ट्याचा चुडीदार परिधान केला होता. तर सारा अली खान पिवळ्या रंगाच्या चुडीदारमध्ये दिसून आली.या तिघांचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. यामध्ये तिन्ही सेलिब्रेटी राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधताना दिसून येत आहेत.

हे ही वाचा:

ब्रह्मास्त्र रिलीजसह, आयनॉक्स आणि पीव्हीआरच्या स्टॉक्समध्ये झाली मोठी घसरण

सीबीएसई १०वी कंपार्टमेंट निकाल २०२२: कंपार्टमेंट निकाल गुण पडताळणी आणि पुनर्मूल्यांकन वेळापत्रक जाहीर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version