spot_img
Monday, September 16, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Deepika Padukone मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल, लवकरच येऊ शकते गोड बातमी!

बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री दीपिका पादुकोण (Superstar actress Deepika Padukone) आता लवकरच आई होणार आहे. दीपिका ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. परंतु सध्या ती तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे. दीपिका तिच्या बाळाची आतुरतेने वाट पाहत आहे.

Deepika Padukone Hospitalized : बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री दीपिका पादुकोण (Superstar actress Deepika Padukone) आता लवकरच आई होणार आहे. दीपिका ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. परंतु सध्या ती तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे. दीपिका तिच्या बाळाची आतुरतेने वाट पाहत आहे. दीपिका प्रेग्नेंट असून सध्या हा काळ इन्जॉय करत असताना दिसून येत आहे. तर दीपिका पदुकोण सप्टेंबरमध्ये आपल्या मुलाला जन्म देऊ शकते. आता अभिनेत्रीची कार मुंबईतील एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये जाताना दिसली आहे. त्यामुळे आता ती लवकरच आपल्या बाळाला जन्म देईल अश्या चर्चाना चांगलंच उधाण आलं आहे.

दीपिका पदुकोणला एचएन रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. अभिनेत्री कधीही मुलाला जन्म देऊ शकते. दीपिका पदुकोणसोबत तिच्या कुटुंबातील इतर काही सदस्यही दिसले. गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधी रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात पोहोचले होते. दीपिकाने पारंपारिक लूकमध्ये बाप्पाचे दर्शन घेतले. तिने हिरव्या रंगाची सिल्क साडी घातली होती. तर रणवीर सिंग पांढऱ्या रंगाच्या कुर्ता पायजमामध्ये गणेशाच्या दरबारात दिसला.

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची मुलगी राहा कपूर हिचाही जन्म मुंबईच्या एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये झाला होता. रणबीर आणि आलिया भट्ट यांनी एप्रिल २०२२ मध्ये लग्न केले होते. लग्नाच्या वेळी अभिनेत्री गरोदर होती. लग्नानंतर अवघ्या सात महिन्यांनी तिने राहाला जन्म दिला. राहाचा जन्म नोव्हेंबर २०२२ मध्ये त्याच हॉस्पिटलमध्ये झाला होता ज्यामध्ये दीपिकाची प्रसूती झाल्याची माहिती आहे. तर रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण लग्नाच्या ६ वर्षानंतर आई-वडील होणार आहेत. या स्टार जोडप्याने २०१८ साली मोठ्या थाटामाटात लग्न केले. दीपिका तिच्या प्रेग्नेंसीमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. सप्टेंबरमध्ये ती बाळाचे स्वागत करू शकते अशा बातम्या आल्या होत्या. आता त्याच्या रुग्णालयात दाखल झाल्यामुळे या बातम्यांना पुन्हा वेग आला आहे.

दीपिका पदुकोणनेही नुकतेच प्रेग्नेंसी फोटोशूट केले आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिच्या बेबी बंपचे अनेक फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये रणवीर सिंगही तिच्यासोबत पोज देताना दिसला.

Latest Posts

Don't Miss